NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Katrina Kaif Birthday : कधीच शाळेत गेली नाही कतरिना, घरीच बसून करायची अभ्यास; कारण वाचून व्हाल चकित

Katrina Kaif Birthday : कधीच शाळेत गेली नाही कतरिना, घरीच बसून करायची अभ्यास; कारण वाचून व्हाल चकित

बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींनपैकी एक म्हणजे कतरिना कैफ. आज ही अभिनेत्री आज तिचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्त जाणून घ्या तिच्या आयुष्याविषयी काही रंजक गोष्टी.

18

कतरिना कैफची गणना आज बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्रींमध्ये केली जाते. हे स्थान मिळवणं तिच्यासाठी सोपं नव्हतं.

28

परदेशात जन्मलेल्या कतरिना कैफचे वडील मोहम्मद कैफ हे काश्मिरी वंशाचे ब्रिटिश व्यापारी होते तर आई सुझान ब्रिटिश नागरिक आहे.

38

कतरिनाच्या लहानपणी तिचे वडील कतरिनासह तिच्या भावंडांना वाऱ्यावर सोडून गेले. त्यामुळे तिच्या आईची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली राहिली नाही.

48

अभिनेत्रीचे बालपण एक-दोन नव्हे तर तब्बल 18 देशांमध्ये गेले. कतरिना कैफ सतत प्रवासामुळे कधीच शाळेत जाऊ शकली नाही.

58

त्यानंतर अभिनेत्री मित्रांसोबत भारतात फिरायला आली आणि तिने एका मॉडेलिंग स्पर्धेत भाग घेतला. तेव्हाच तिच्यावर बॉलिवूडच्या एका निर्मात्याची नजर पडली आणि अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये एंट्री घेण्याची संधी मिळाली.

68

कतरिनाने 2003 मध्ये बूम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं मात्र हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. मात्र, काही वर्षांनी तिने वेलकम आणि मैने प्यार क्यूं किया यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.

78

कतरिनाच्या खराब हिंदी आणि अभिनयामुळे तिला अनेकवेळा सरळ नकार देण्यात आला, पण या नकाराने कॅट खचली नाही. काळानुसार अभिनेत्रीच्या अभिनयात बरीच सुधारणा झाली आहे. अभिनेत्री हळूहळू तिच्या करिअरमध्ये प्रगती करत राहिली आणि तिने पुन्हा मागे वळून पाहिले नाही.

88

कतरिना बॉलिवूडचे स्टार्स रणबीर कपूर आणि सलमान खानच्या प्रेमात होती. पण या दोघांसोबतही तिचं नातं फार काळ टिकलं नाही. त्यानंतर अभिनेत्रीनं विक्की कौशल सोबत लग्नगाठ बांधली.

  • FIRST PUBLISHED :