NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / बॉलिवूडपासून दूर तरीही 'या' बिझनेसमधून कोट्यवधी कमावते करिश्मा कपूर; एकूण नेटवर्थ वाचून व्हाल थक्क

बॉलिवूडपासून दूर तरीही 'या' बिझनेसमधून कोट्यवधी कमावते करिश्मा कपूर; एकूण नेटवर्थ वाचून व्हाल थक्क

HBD Karishma Kapoor : 90 च्या दशकातील सुपरहिट अभिनेत्री असलेल्या करिश्मा कपूरने आज वयाची 50 वर्ष पूर्ण केली आहेत. करिश्मा आता जरी चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी तिच्या सौंदर्याने आजही ती चाहत्यांना घायाळ करते. करिश्मा कपूर एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करत असे. पण आज ती जास्त चित्रपटांमध्ये दिसत नाही. असं असलं तरी अभिनेत्रीने विविध माध्यमांतून कोट्यवधींची संपत्ती कमावली आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया बॉलिवूडच्या लोलोची नेटवर्थ.

18

करिश्मा कपूरने 1991 मध्ये 'प्रेम कैदी' या चित्रपटाद्वारे तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आजकाल करिश्मा कपूर चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी यापूर्वी ती अनेक वेब सीरिज आणि जाहिरातींमध्ये दिसली आहे.

28

लग्नानंतर करिश्मा कपूर बराच काळ मोठ्या पडद्यापासून दूर राहिली. पण जेव्हा ती टीव्ही रिअॅलिटी शो 'नच बलिये'मध्ये जज म्हणून परतली तेव्हा तिच्या कमबॅकचे खूप कौतुक झाले.

38

मीडिया रिपोर्ट्सनुसार, करिश्मा कपूरची एकूण संपत्ती सुमारे 400 कोटी रुपये आहे. स्मार्ट शेअर गुंतवणूक, शेअरहोल्डिंग आणि मालमत्तांमध्ये गुंतवणूक करून तिने भरपूर संपत्ती कमावली आहे.

48

करिश्मा कपूर चित्रपटांमध्ये कमी दिसत असेल पण ती वेब सीरिज आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून खूप कमाई करते. एका जाहिरातीसाठी ती 1.5 कोटी रुपये घेते.

58

त्याच वेळी, करिश्मा कपूर दिल्लीमध्ये अनेक रेस्टॉरंट्स 'फॅट कपूर बर्गर चेन' या नावाने चालवते. करिश्मा कपूरने मुंबई एंजल्स' ही फुटबॉल टीम देखील विकत घेतली आहे.

68

करिश्माने तिचा स्वतःचा व्होडका ब्रँड प्युअर वंडरकपूर - इंडिया देखील लॉन्च केला आहे आणि 'करिश्मा कपूर सेडक्शन' नावाची फॅशन लाइन आहे. करिश्मा कपूर या सर्व गोष्टींमधून करोडोंची कमाई करते.

78

करिश्मा कपूरने बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टार्ससोबत काम केले असून आजही मोठ्या पडद्यापासून दूर असतानाही तिने आपला क्लास जपला आहे. पती संजय कपूरशी घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूर आपल्या मुलांसोबत मुंबईतील खार भागातील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहते.

88

करिश्मा कपूरला प्राचीन वस्तूंची खूप आवड आहे. महागड्या चित्रांचा संग्रह तिच्या घरात पाहायला मिळतो. करिश्मा कपूरच्या या आलिशान अपार्टमेंटची किंमत जवळपास 12 कोटी आहे. करिश्मा कपूर महागड्या वाहनांचीही शौकीन आहे. तिच्याकडे कडे Mercedes Benz S Class, Lexus LX 470, Mercedes Benz E Class, BMW 7 Series आणि Audi Q7 सारखी महागड्या गाड्या आहेत.

  • FIRST PUBLISHED :