NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Karan Johar: ब्रिटिशच्या संसदेत करण जोहरचा सन्मान; कारणही आहे खास

Karan Johar: ब्रिटिशच्या संसदेत करण जोहरचा सन्मान; कारणही आहे खास

प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माता करण जोहर सध्या चर्चेत आहे. त्याने बॉलिवूडमध्ये २५ वर्ष पूर्ण केले आहेत. सगळीकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यानंतर त्याच्या कारकिर्दीत अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

18

प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माता करण जोहरचा ब्रिटिशच्या संसदेत सन्मान झाला.

28

करणला 20 जून रोजी ब्रिटीश संसदेत जागतिक मनोरंजन उद्योगातील त्याच्या अमूल्य योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.

38

करणने भारतीय चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून आपली २५ वर्षे पूर्ण केली आहेत. या खाजगी कार्यक्रमाचे आयोजन लीसेस्टरच्या बॅरोनेस वर्मा यांनी केले होते.

48

यामध्ये लॉर्ड देसाई, बॅरोनेस उद्दीन आणि सेवानिवृत्त माननीय तनमनजीत सिंग देसी यांसारख्या खासदारांसह ब्रिटिश आशियाई ट्रेलब्लेझर्स, प्रभावशाली आणि समुदाय नेत्यांचा समावेश होता.

58

करणचे युनायटेड किंगडमशी खास नाते आहे. या देशात कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, ए दिल है मुश्कील यांसारख्या चित्रपटांसाठी त्याने चित्रीकरण केले आहे.

68

लोकांना लंडनमध्ये येण्यासाठी आकर्षित करण्यासाठी आणि आमंत्रित करण्यासाठी 2012 मध्ये ब्रिटनच्या भेटीचे सदिच्छा दूत म्हणून देखील त्याची नियुक्ती करण्यात आली होती.

78

करणचे दिग्दर्शनातील 'कभी खुशी कभी गम' आणि 'माय नेम इज खान' हे यूके बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारे भारतीय चित्रपट आहेत, ज्यांनी अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत.

88

विशेष म्हणजे, बऱ्याच काळानंतर करण लवकरच दिग्दर्शक म्हणून परतणार आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' असे त्याच्या दिग्दर्शित चित्रपटाचे नाव आहे. नुकताच त्याचा टीझर रिलीज झाला आहे, ज्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. हा चित्रपट 28 जुलै रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

  • FIRST PUBLISHED :