बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) सध्या तिचा आगामी चित्रपट धाकड़’ (Dhakad) मध्ये व्यस्त आहे. नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत, ज्याने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे.
याशिवाय तिने महान शायर गालिब यांची शायरीही लिहीली आहे. त्यानंतर तिच्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
कंगनाने लिहीलं, ‘निकलना खुद से आदम का सुनते आए हैं लेकिन, बहुत बेआबरू होकर तेरे कूचे से हम निकले-गालिब’.
त्यानंतर तिला अनेक कमेंट्सही मिळाल्या आहेत. एका युझरने लिहीलं, 'काय हरवलंस हृतिक तू, बघ..'
कंगना तिच्या वक्तव्यांमुळे फारच चर्चेत असते.
कंगना बुडापेस्टमध्ये ती तिच्या आगामी ‘धाकड़’ चित्रपटाचं शुटींग करत आहे. तिच्या टीमसोबत तिने फोटो शेअर केले होते.
कंगना सध्या भारतापासून दूर असली तरीही भारतातील सगळ्या गोष्टींवर तिचं बारिक लक्ष आहे.
सोशल मीडियावर ती सक्रिय असते. तिच्या थलायवी चित्रपटातील काही फोटो तिने शेअर केले होते.