कंगना रनौत सध्या 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. ती विविधांगी भूमिका साकारण्यावर भर देते.
'इमर्जन्सी' मध्ये इंदिरा गांधींची भूमिका साकारल्यानंतर कंगना आता अजून एका हटके भूमिकेत दिसणार आहे.
नुकतंच त्याविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.
अभिनेत्री कंगना रणौतने आता चंद्रमुखी 2 या चित्रपटात झळकणार आहे.
या चित्रपटात कंगना एका राजाच्या दरबारातील नर्तकी चंद्रमुखीची मुख्य भूमिका साकारणार आहे.
अभिनेत्री कंगना रणौतने एक अपडेट शेअर केला आहे ज्यामध्ये तिने म्हटले आहे की चंद्रमुखी 2 चित्रपटाच्या क्लायमॅक्स गाण्यासाठी रिहर्सल सुरू झाली आहे.
कंगनाने तिच्या ट्विटर हँडलवर चित्रपटाविषयी अपडेट दिले आहे. तिने म्हटलंय, 'कला मास्टरजींसोबत चंद्रमुखी 2 च्या क्लायमॅक्स गाण्याची रिहर्सल सुरू केली. हे गाणे गोल्डन ग्लोब विजेते श्री एम एम कीरावानी जी यांनी संगीतबद्ध केले आहे. महान श्री पी. वासू जी यांनी दिग्दर्शित केले'.
चंद्रमुखी हा मल्याळम चित्रपट मणिचित्रथाझूचा रीमेक आहे आणि अक्षय कुमार-स्टारर भूल भुलैया म्हणून हिंदीमध्ये रूपांतरित झाला.
चंद्रमुखी 2 चे दिग्दर्शन पी. वासू यांनी केले आहे.
चंद्रमुखी या भूमिकेसाठी कंगना चांगलीच उत्सुक दिसत आहे. दरम्यान कंगना आगामी काळात तेजस, इमर्जन्सी आणि नॉटी बिनोदिनी या चित्रपटात दिसणार आहे.