तमिळ सिनेमात सेंच्युरी कमाई करणाऱ्या अभिनेता रजनीकांत, धनुष, अल्लू अर्जुन नाहीये. तो अभिनेता पॅन इंडिया स्टार आहे. तमिळबरोबरच बॉलिवूड सिनेमातही त्याचा दबदबा पाहायला मिळतो.
200 कोटींची कमाई करणारा अभिनेता म्हणजेच कमल हसन. 2008मध्ये आलेल्या दशावतार या सिनेमाची जगभरात चर्चा झाली. कमल हसनच्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 200 कोटींची कमाई केली होती. त्या वर्षी सर्वाधिक कमाई करणारा भारतीय सिनेमा ठरला. त्यानंतर काही महिन्यांनी आमिर खानच्या गजनी सिनेमानं 232 कोटींची कमाई करत हा रेकॉर्ड मोडला.
दशावतार या सिनेमानं तमिळ सिनेमात नवा रेकॉर्ड तयार केला. या सिनेमानं रजनीकांत यांच्या शिवाजी द बॉस या सिनेमाचा रेकॉर्ड तोडला होता. 2007मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमानं 159 कोटी रुपये कमावले होते. दशावतार सिनेमाचं बजेट 60 कोटी होतं आणि सिनेमानं तिप्पट कमाई केली. सिनेमाचं अर्ध्ये पैसे तर 50 कोटींचे डिजिटल राइट्स विकून मिळाले होते.
त्यानंतर कमल हसनने आपल्या सिनेमाचा रेकॉर्ड स्वत:चं ब्रेक केला होता. 2013मध्ये आलेल्या विश्वरुपम सिनेमानं 220 कोटींची कमाई केली. त्यानंतर 2022मध्ये आलेल्या विक्रम सिनेमानं 500 कोटींची कमाई केली.
कमल हसनची स्टारपॉवर, सिनेमाची कन्सेप्ट आणि प्रोडर्शन वॅल्युज ही दशावतार सिनेमाची खासियत होती. या सिनेमात कमल हसनने 10 वेगवेगळ्या भुमिका साकारल्या होत्या. अँक्शन थ्रिलर असलेल्या या सिनेमात VFXचा चांगल्या प्रकारे वापर करण्यात आला होता. सिनेमात कमल हसनबरोबर असिन, जयाप्रदा आणि मल्लिका शेरावत प्रमुख भुमिकेत होते.