बॉलिवूडच्या काही चर्चेत असलेल्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे कल्की कोचलिन. कल्किनं तिच्या नावानंच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
पण एक काळ असा होता जिथे कल्कीला तिच्या रंगावरून वेगळीच ओळख मिळाली होती. तिला ड्रग्ज पेडलर समजलं जात होतं.
कल्कीनं एका मुलाखतीत खुलासा करत म्हटलं होतं की, भारतात मी गोरी मुलगी असल्याने माझ्याकडे अनेक लोक ड्रग्जची मागणी करायचे. माझ्या रंगावरून लोक मला मी परदेशी असल्याचं समजायचे आणि माझ्याकडे ड्रग्ज मागायचे".
"माझ्या सारख्या गोऱ्या रंगाच्या मुली या परेदशी आणि ड्रग्ज विकणाऱ्या आहेत असंच त्यांना वाटायचं. मी जेव्हा त्यांच्याशी तमिळमध्ये बोलायचे तेव्हा त्यांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलून जायचा".
कल्की पुढे म्हणाली, "मला एका मेकअप आर्टिस्टने माझ्या चेहऱ्यावर खूप सुरकुत्या आहेत म्हणून मी तुला आय लाइनर लावणार नाही असं सांगितलं होतं. माझ्या दातांवरूनही मला अनेकदा बोललं जायचं".
कल्कीनं कास्टिंग काउचचा अनुभव देखील बिनधास्त सर्वांबरोबर शेअर केला. कल्की म्हणाली, "मला एका निर्मात्याने जी ऑफर दिली ती ऐकून मला खूप मोठा धक्का बसला होता".
"त्याने मला म्हटलं की, आपण जेवण करण्यासाठी बाहेर जाऊ शकतो का? त्याच्या बोलण्याचा अंदाज आणि वागणूक माझ्या लक्षात आली आणि मी तिथल्या तिले खडसावलं".
"हे बघा तुम्ही हे नीट लक्षात ठेवा की, हे माझ्यासाठी नाहीये आणि मी त्यातली मुलगी नाहीये", अशा शब्दात कल्कीनं त्या निर्मात्याला खडसावलं होतं.