NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Kajol : 'ती गोष्ट आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग....' स्त्रीसुखाविषयी स्पष्टच बोलली काजोल

Kajol : 'ती गोष्ट आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग....' स्त्रीसुखाविषयी स्पष्टच बोलली काजोल

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच एक चित्रपट रिलीज झाला आहे ज्याची सगळीकडेच चर्चा आहे. मृणाल ठाकूर, तमन्ना भाटिया ते काजोल या अभिनेत्री मुख्य भूमिकेत असणारा चित्रपट लस्ट स्टोरीज 2 सध्या चाहत्यांचं मन जिंकत आहे. या चित्रपटात सगळ्यात जास्त चर्चा झाली काजोलने दिलेल्या इंटिमेट सीन्सची. नुकतंच काजोलनं महिलांच्या लैंगिक सुखावर मोकळेपणानं भाष्य केले आहे. तिने केलेलं हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.

18

लस्ट स्टोरीज 2 या चित्रपटात ४८ वर्षीय काजोलनं इंटिमेट सीन्स दिले आहेत. तिच्या भूमिकेचं चाहते कौतुक करत आहेत.

28

असं असताना आता अभिनेत्रीनं महिलांच्या लैंगिक सुखावर खुलेपणाने भाष्य केले आहे. तिने केलेलं हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.

38

एका मुलाखतीत काजोलने महिलांच्या सुखाबाबत खुलेपणाने भाष्य केलं. याविषयी बोलताना ती म्हणाली की, 'अनादी काळापासून आपण या गोष्टींबाबत मोकळेपणानं बोलतो. लैंगिक सुखाविषयी आपल्या धर्मग्रंथात, पुस्तकांमध्ये उघडपणे लिहिलेलं आहे.

48

ती पुढे म्हणाली की, 'हा देखील आपल्या शिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग आहे, परंतु काही दशकांपासून आपण या गोष्टी आपल्यापासून दूर ठेवल्या आहेत.'

58

याबाबतच बोलताना काजोल म्हणाली, 'ही गोष्ट आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असल्याने आपण तिला अगदी सामान्य समजणं आवश्यक आहे. खाणे आणि पिणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे, त्याच प्रकारे ही देखील गोष्ट पूर्णपणे सामान्य आहे. आपण लोकांना या समस्यांबद्दल बोलण्यास प्रोत्साहित केले पाहिजे' असं मत तिने व्यक्त केलं आहे.

68

या मुलाखतीत काजोलने आजकाल चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या इंटिमेट सीन्सवर देखील भाष्य केलं आहे.

78

काजोल म्हणाली की, 'यापूर्वी दोन फुलं पडद्यावर दाखवण्यात येत असतं आणि त्याच्या पुढच्या सीनमध्ये ती महिला गरोदर दाखवली जात असे. मात्र आता काळ बदलला आहे, म्हणून आम्ही Lust Stories 2 सारखे काहीतरी घेऊन आलो आहोत.'

88

ती म्हणाली की, 'आजकाल प्रेमावर कोणीही विश्वास ठेवत नाही, आता प्रत्येकाला अनेक जोडीदारांची गरज आहे आणि म्हणूनच आम्ही या चित्रपटात दाखवलेल्या सर्व लव्हस्टोरीज खूप वेगळ्या पद्धतीने दाखवल्या गेल्या आहेत. मैत्री, आधुनिक नातेसंबंध आणि समाज यावर या चित्रपटाची कथा आधारित आहे.'

  • FIRST PUBLISHED :