अजय देवगण आणि काजोल हे सेलिब्रिटी कपल प्रचंड लोकप्रिय आहे.
या दोघांना बॉलिवूडमधील आदर्श जोडी मानले जाते.
अजय देवगण आणि काजोल यांच्या लग्नाला २० वर्षांपेक्षा जास्त वर्ष उलटून गेले आहेत. पण काजोलने या दोघांच्या लग्नाविषयी धक्कादायक खुलासे केले आहेत
काजोलने सांगितले कि, अजय देवगणने तिला कधीच प्रपोज केले नव्हते, असा खुलासा काजोलने केला आहे. ती म्हणाली सुरुवातीला तिला या गोष्टीचे वाईट वाटायचे पण आता काही फरक पडत नाही.
काजोलने सांगितले कि, तिच्या वडिलांचा अजय देवगणसोबत लग्न करण्यासाठी विरोध होता. तेव्हा ते चार दिवस तिच्याशी बोलले देखील नव्हते पण कालांतराने परिस्थिती चांगली झाली.
अजय देवगण त्यांच्या हनीमूनला आजारी पडला होता असा खुलासा काजोलने केला आहे.
त्याचे स्पष्टीकरण देत ती म्हणाली आम्ही जवळजवळ पाच आठवडे फिरत होतो. जेव्हा इजिप्तमध्ये होतो तेव्हा अजय आजारी पडला आणि आम्ही घरी परत आलो.
तसेच काजोलने वेदनादायक गर्भपाताची वेदनादायक आठवण देखील सांगितली. तिचा पहिला गर्भपात कधी खुशी कभी गम या चित्रपटादरम्यान झाला आणि या वेदना सहन करत असताना तिने चित्रपटात काम केले.
त्यानंतर तिला दुसऱ्या गर्भपाताला सामोरे जावे लागले. तो काळ तिच्यासाठी खूप कठीण होता असे तिने सांगितले.
पण सध्या काजोल खूप आनंदी आहे की तिला न्यासा आणि युग यांच्यासारखी मुले मिळाली. ती या दोघांना देवाचा आशीर्वाद समजते. ती अजयसोबत संसारात खूप आनंदी असल्याचं देखील सांगते.