झी मराठीवरच्या जय मल्हार मालिकेद्वारे घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे ईशा केसकर. या मालिकेत तिने बानू ही भूमिका साकारली होती.
तिने या मालिकेतून अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली.
नुकतीच ही अभिनेत्री ‘सरला एक कोटी’ या चित्रपटात दिसली होती. त्याला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला.
बोल्ड आणि ब्युटीफुल ईशा मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या प्रेमात आहे.
नुकतीच त्याच्या वाढदिवशी तिने रोमँटिक शुभेच्छा दिल्या आहेत.
ईशा केसकर ही अभिनेता ऋषी सक्सेनाच्या प्रेमात आहे. गेल्या काही वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत.
ऋषी सक्सेनाचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने तिने त्याला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
ऋषीला शुभेच्छा देताना ईशा म्हणाली, 'ऋषी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू खरंच सगळ्यात बेस्ट आहेस. माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे.'
ऋषी सक्सेना हिंदी भाषिक असला तरी त्याने मराठी चित्रपटसृष्टीत चांगलाच नाव कमावलं आहे. '
ऋषीने झी मराठीवरच्या 'काहे दिया परदेस' मालिकेतून अभिनयविश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर तो शेर शिवराज, पावनखिंड यासारख्या ऐतिहासिक चित्रपटात झळकला होता.