NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Janhvi Kapoor: EMI चे पैसे भरण्यासाठी जान्हवी कपूर करतेय 'हे' काम

Janhvi Kapoor: EMI चे पैसे भरण्यासाठी जान्हवी कपूर करतेय 'हे' काम

जान्हवी कपूर मोठ्या पडद्यावर जरी साध्यासुध्या मुलीची भूमिका निभावत असली तरी खऱ्या आयुष्यात मात्र ती प्रचंड ग्लॅमरस आहे. ती तिचे अनेक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.अल्पावधीतच या फोटोंवर चाहते कमेंट्स आणि लाईक्सचा अक्षरशः पाऊस पाडतात. आता नुकतंच जान्हवीने ती सोशल मीडियावर एवढ्या मोठ्या प्रमाणात फोटो अपलोड का करते त्यामागचं खरं कारण सांगितलं आहे.

18

जान्हवी कपूर तिचे अनेक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.अल्पावधीतच या फोटोंवर चाहते कमेंट्स आणि लाईक्सचा अक्षरशः पाऊस पाडतात.

28

आता नुकतंच जान्हवीने ती सोशल मीडियावर एवढ्या मोठ्या प्रमाणात फोटो अपलोड का करते त्यामागचं खरं कारण सांगितलं आहे.

38

नुकत्याच एका ऑनलाईन पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये जान्हवीने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. आपण करत असलेल्या सोशल मीडिया पोस्ट ही केवळ एक मजा आहे आणि त्यातून जास्तीत जास्त ब्रँडची जाहिरात कशी मिळवता येईल याकडे लक्ष असतं असं जान्हवीने मस्करीत सांगितलं.

48

याबद्दल जान्हवी पुढे म्हणाली, ''माझ्या सोशल मीडिया पोस्ट मीच जास्त गंभीर्याने घेत नाही.''

58

''पण जर मी सोशल मीडिया पोस्टमध्ये चांगली दिसले आणि काही जास्त लोकांनी माझ्या पोस्ट लाइक केल्या तर आपसूकच मला चांगल्या ब्रँडचं प्रमोशन करता येईल आणि त्यामुळे मला माझे इएमआय हफ्ते लवकर फेडता येतील.'' असं विधान जान्हवीने या मुलाखतीत केलं.

68

जान्हवीचा 'मिली' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. तिच्या वडिलांनी म्हणजेच बोनी कपूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. पण नेहमीप्रमाणे प्रेक्षकांना हा चित्रपट फारसा आवडलेला दिसत नाही.

78

या चित्रपटाला प्रेक्षकांचा फार कमी प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने जेमतेम २ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.

88

वर्कफ्रंट वर जान्हवी कपूर आगामी काळात राजकुमार राव आणि वरुण धवनसोबत 'बावल' तसेच 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटात झळकणार आहे.

  • FIRST PUBLISHED :