NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Indian Idol 13 Winner: दत्तक पुत्रांनं काढलं नशीब! इंडियन आयडॉलचा विजेता ऋषी बद्दल 'या' गोष्टी वाचून व्हाल थक्क

Indian Idol 13 Winner: दत्तक पुत्रांनं काढलं नशीब! इंडियन आयडॉलचा विजेता ऋषी बद्दल 'या' गोष्टी वाचून व्हाल थक्क

लोकप्रिय रिॲलिटी शो ‘इंडियन आयडॉल 13’चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. यंदाच्या सीझनचं विजेतेपद अयोध्येच्या ऋषी सिंहने पटकावलं आहे. सध्या त्याच्यावर कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पण त्याच्या आयुष्याविषयी एका गोष्टीची सध्या प्रामुख्याने चर्चा होतेय. जाणून घेऊया 'इंडियन आयडॉल 13' चा विजेता ऋषी सिंगबद्दल काही रंजक गोष्टी...

18

लोकप्रिय रिॲलिटी शो ‘इंडियन आयडॉल 13’चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. प्रेक्षकांकडून सर्वाधिक मतं मिळवत ऋषीने विजेतेपद जिंकलं आहे.

28

ऋषी सिंग हा मूळचा अयोध्या, उत्तर प्रदेशचा आहे. त्याला गाणी लिहिण्याची आणि गाण्याची नेहमीच आवड होती. ऋषी सिंग सध्या डेहराडूनमधील हिमगिरी जी विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करत आहेत.

38

ऋषीचा आजवरचा प्रवास काही सोपा नव्हता. ऋषीने इंडियन आयडॉलच्या मंचावर ऑडिशन दरम्यानच त्याने आपल्या खाजगी आयुष्याविषयी मोठा खुलासा केला होता.

48

ऋषी त्याच्या आईवडिलांचा खरा मुलगा नाही. इंडियन आयडॉलच्या थिएटर राऊंडनंतर तो जेव्हा घरी पोहोचला होता, तेव्हा ऋषीला समजलं होतं की त्याच्या आईवडिलांना त्याला दत्तक घेतलं आहे.

58

याविषयी ऋषी म्हणाला होता, 'माझ्या आईवडिलांनी मला दत्तक घेतलंय. पण जर मी त्यांच्यासोबत नसतो, तर आज कदाचित मी या मंचावर पोहोचलो नसतो.'

68

तो पुढे म्हणाला होता कि, 'मी माझ्या आयुष्यात जितक्या चुका केल्या आहेत, त्यासाठी मी माझ्या आईवडिलांची माफी मागू इच्छितो. मला त्यांच्या रुपात जणू देवच भेटले आहेत. नाहीतर आज मी कुठे असतो याची कल्पनाच मी करू शकत नाही.'

78

ऋषी सिंहने विजेतेपद जिंकत आई वडिलांचं नशीब काढलं असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

88

विजेता ठरल्यानंतर ऋषीला 25 लाख रुपये आणि एक मारुती सुझुकी एसयुव्ही कार भेट म्हणून मिळाली. याशिवाय ऋषीसोबत सोनी म्युझिक इंडियाने रेकॉर्डिंगचा करारही केला आहे.

  • FIRST PUBLISHED :