NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Independence day 2022: बॉलिवूडमध्ये फडकला तिरंगा; अमिताभ बच्चन ते विकी कतरीना पर्यंत कलाकारांनी दिल्या शुभेच्छा

Independence day 2022: बॉलिवूडमध्ये फडकला तिरंगा; अमिताभ बच्चन ते विकी कतरीना पर्यंत कलाकारांनी दिल्या शुभेच्छा

आजचा दिवस हा सगळ्याच भारतीयांसाठी खूप अभिमानाचा आणि खास दिवस आहे. आजच्या या स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत बॉलिवूडच्या बड्या कलाकारांनी सुद्धा प्रेक्षक आणि चाहत्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

113

आज भारताच्या स्वातंत्र्यदिनाची अमृत महोत्सवी वर्ष पूर्ण होत असताना सगळीकडे आनंद आणि उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. बॉलिवूडच्या अनेक मोठ्या स्टार कलाकारांनी सुद्धा आजच्या दिवशी चाहत्यांना शुभेच्छा देत आजच्या दिवसाचा आनंद द्विगुणित केला आहे.

213

महानायक अमिताभ बच्चन यांनी भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत एका अनोख्या अंदाजात राष्ट्रगीत सादर केलं आहे. बिग बीं सह यामध्ये अनेक लहान मुलं सहभागी झाली असून यावर्षीचा स्वातंत्र्यदिन अमिताभ यांनी मूकबधिर मुलांच्या साइन लँग्वेजचा वापर करत भारताचं राष्ट्रगीत गायलं आहे. त्यांच्या या अनोख्या शुभेच्छा सगळ्यांनाच आवडल्या असून त्यांच्या या उपक्रमाचं कौतुक होत आहे.

313

अभिनेता आयुष्मान खुराना आजच्या दिवसाचं औचित्य साधत जम्मू येथील BSF जवानांची भेट घेऊन आल्याचं समोर आलं आहे. यानिमित्ताने त्याने जवनांसोबत क्रिकेट खेळत त्यांच्या ट्रेनिंगमध्ये सहभाग सुद्धा घेतला. त्याने जवानांशी गप्पा मारल्याची दृश्य सुद्धा बघायला मिळत आहेत.

413

बॉलिवूडचं क्युट कपल विकी कतरिनाने सुद्धा भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदात सहभागी होत घरी तिरंगा फडकवल्याचं दिसून आलं. दोघांनी एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या.

513

अभिनेता अक्षय कुमारने सुद्धा एक सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत आजच्या दिवशी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याची कॅप्शन सध्या फारच लक्षवेधी ठरत आहे.

613

धाकड अभिनेत्री कंगना रनौतने सुद्धा चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या कंगना डेंग्यूने ग्रस्त आहे. आजारी असूनही तिच्यामध्ये असलेलं देशप्रेम लपून राहिलं नसल्याचं बघायला मिळालं आहे. तिने शेअर केलेली इन्स्टाग्राम स्टोरी सध्या फार लक्षवेधी ठरत आहे.

713

भाईजान सलमान खानने सुद्धा एक स्पेशल फोटो शेअर करून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये सलमान भारताचा झेंडा हातात घेऊन फडकवताना दिसत आहे.

813

अभिनेता कार्तिक आर्यनने सुद्धा एका आगळ्यावेगळ्या अंदाजात चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कार्तिकने नौसेनेच्या जवानांसोबत एक अख्खा दिवस व्यतीत करून खूप धमाल केल्याचं बघायला मिळालं. यादरम्यान त्याने नौसेना दलातील सैनिकांच्या अनेक कथा ऐकल्या त्यांच्याशी गप्पा मारल्या. तसंच त्याने एक भलामोठा फोटो शेअर करत आपलं देशप्रेम दाखवलं आहे.

913

किंग खान एसआरके सुद्धा केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी झाल्याचं बघायला मिळालं. शाहरुखने आपल्या कुटुंबियांसोबत घरी ध्वजारोहण केल्याचं बघायला मिळालं.

1013

विरुष्का म्हणजे विराट अनुष्का या कपलने सुद्धा तिरंग्यासह एक सुंदर फोटो शेअर करत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

1113

अभिनेत्री करिना कपूरने सुद्धा इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

1213

तापसी पन्नू या अभिनेत्रीने अशोक चक्राबद्दल एक अत्यंत वेगळी माहिती शेअर करत आपल्या खास मेसेजसह स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

1313

अभिनेत्री सारा अली खानने सुद्धा तिच्या अप्रतिम अंदाजात स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

  • FIRST PUBLISHED :