NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / IIFA लाही लागलं मराठी चित्रपटाचं 'वेड'; रितेश जिनिलियाने जोडीनं स्वीकारला 'हा' मानाचा पुरस्कार

IIFA लाही लागलं मराठी चित्रपटाचं 'वेड'; रितेश जिनिलियाने जोडीनं स्वीकारला 'हा' मानाचा पुरस्कार

रितेश आणि जिनिलियाच्या वेड चित्रपटाने सगळ्यांनाच भुरळ पाडली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. वेड चित्रपटामधून रितेश आणि जिनिलियाची जोडी हिट झाली. फक्त बॉक्स ऑफिसवरच नाही तर ओटीटीवर देखील या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळाला. या चित्रपटानं अनेक मराठी पुरस्कार जिंकले. पण आता हिंदी पुरस्कारावर देखील या सिनेमानं नाव कोरलं आहे.

18

'आयफा' हा बॉलीवूडमध्ये मानाचा मानला जाणारा पुरस्कार आहे. नुकताच हा पुरस्कार सोहळा यंदाच्या वर्षी अबू दाबी येथे पार पडला. यात रितेश जिनिलियाने खास हजेरी लावली होती.

28

या पुरस्कार सोहळ्यात या जोडीने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं.

38

‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘वेड’ चित्रपटाला प्रादेशिक चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार मिळाला.

48

या चित्रपटाचा दिग्दर्शक रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनिलिया देशमुख यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

58

यावेळी रितेश आणि जेनिलियाने परीक्षकांचे आणि प्रेक्षकांचेही आभार मानले. आयफाने आपल्या सोशल मीडिया पेजवरून ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

68

ही आनंदाची बातमी ऐकून चाहते रितेश आणि जिनिलियाचं चांगलंच कौतुक करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

78

वेड चित्रपटामधून रितेश आणि जिनिलियाची जोडी हिट झाली. फक्त बॉक्स ऑफिसवरच नाही तर ओटीटीवर देखील या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळाला.

88

प्रेक्षकांच्या खास आग्रहास्तव मराठीसह हिंदी भाषेत देखील हा चित्रपट डब करण्यात आला असून प्रेक्षक त्याला उत्तम प्रतिसाद देताना दिसून येतायत.

  • FIRST PUBLISHED :