अभिनेत्री हृता दुर्गुळे सध्या फॉर्म मध्ये आहे.तिचे एकामागोमाग एक चित्रपट प्रदर्शित होत आहेत.
चित्रपटगृहात हिट झाल्यानंतर आता तिचा 'अनन्या' हा चित्रपट आज अमेझॉन प्राईम वर रिलीज झाला आहे.
अनन्या चित्रपटातील भूमिकेसाठी हृताचे सर्वत्र कौतुक झाले. पण तिने याविषयी एक खंत व्यक्त केली आहे.
मराठीतील सध्या आघाडीची अभिनेत्री हृता दुर्गुळेने नुकतीच झी मराठीवरील 'बस बाई बस' या शो मध्ये हजेरी लावली होती.
तिने या शो मध्ये नायिकांविषयी मांडलेलं मत चर्चेचा विषय ठरत आहे.
तिला अभिनेत्रींच कौतुक करताना लोक आखडता हात घेतात का? असा प्रश्न विचारण्यात आला.
तिने 'हो' असं उत्तर देत अनन्या चित्रपटाच्या वेळी तिला आलेला अनुभव सांगितला.
ती म्हणाली 'अनन्या हा स्रीकेंद्रित चित्रपट असल्याने त्याच कौतुक कमी झालं असं मला वाटतं.'
अनन्या या चित्रपटासाठी हृता दुर्गुळे हिने प्रचंड मेहनत घेतली आहे. तिने पायाने लिहिण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेतले.
'अनन्या' या चित्रपटात प्रेक्षकांना स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी धडपडणारी, आयुष्य दिलखुलास जगणारी 'अनन्या' पाहायला मिळाली आहे.'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!' हा मोलाचा सल्ला देणारा हा चित्रपट आहे.