महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री हृता दुगुर्ळे वर्षातील शेवटचे दिवस सेलिब्रेट करण्यासाठी सुट्ट्यांवर निघाली आहे.
एअरपोर्टवरील फोटो शेअर करत 'That Time of the Year' असं म्हणत हृता ट्रिपला निघालीये.
अहो आई अगं आई या नव्या प्रोजेक्टचं शुटींग आटोपून आता निवांतपणे हृता आणि प्रतीक ट्रिप एन्जॉय करणार आहेत.
लग्न झाल्यापासून हृताच्या ट्रिप सुरूच आहेत. प्रतीक आणि ती सातत्यानं विदेश वाऱ्या करताना दिसतात.
लग्नानंतर हनिमूनला हृता आणि प्रतीक तुर्कीला गेले होते.
हनिमूनवरून आल्यानंतर हृता आणि प्रतीक गोव्याला गेले होते.
लग्नाला सहा महिने झाल्यानंतर दोघे थायलंडला गेले होते.
थायलंडच्या फुकेतमधील दोघांचे रोमँटिक फोटो पाहायला मिळाले.
काही दिवसांआधीच हृता नव्या सिनेमाच्या शुटींगसाठी लंडनला गेली होती.
लग्नानंतर ती पहिल्यांदा एकटी विदेशात गेली होती.
लंडनमध्ये शुटींग दरम्यान हृता नवऱ्याला प्रचंड मिस करत होती. अनेक पोस्ट तिनं तेव्हा शेअर केल्या होत्या.
आता न्यू इअर सेलिब्रेशनसाठी दोघे नेमके कुठे निघालेत याची माहिती त्यांनी दिलेली नाही.