सुपरस्टार हृतिक रोशन त्याच्या किलर लूक आणि दमदार अभिनयामुळे करोडो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो.
विक्रम वेधच्या अपयशामुळे हृतिक रोशनला मोठा धक्का बसला आहे. हा चित्रपट केल्यानंतर अभिनेत्यानेही धडा घेतला आहे.
नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार हृतिक रोशनने मोठ्या चित्रपटाची ऑफरही नाकारली आहे.
बातम्यांनुसार, दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी हृतिकला 'रामायण'मध्ये विशेष भूमिका दिली होती, परंतु अभिनेता म्हणतो की त्याला नकारात्मक भूमिका करण्याची चूक पुन्हा करायची नाही.
दिग्दर्शक नितेश तिवारी यांना बऱ्याच दिवसांपासून 'रामायण' मोठ्या पडद्यावर आणण्याची इच्छा होती. यासाठी त्यांनी हृतिक रोशन आणि रणबीर कपूर यांच्याशीही चर्चा केली.
आता सर्व काही फायनल झाल्याचे दिसत असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हृतिक रोशनने 'रामायण'मध्ये काम न करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.
हृतिक रोशन या चित्रपटातून बाहेर पडल्याचे बॉलीवूड हंगामाने सांगितले आहे. याच कारण असं कि, 'हृतिक रोशनला आता नकारात्मक भूमिका करायची नाही. नितेशच्या रामायणाची पटकथाही अभिनेत्याच्या मनाला भिडली. पण त्याला फक्त चित्रपटात हिरोची भूमिका करायची आहे.'
विक्रम वेधा या चित्रपटाच्या अपयशातून त्याने हा धडा घेतला आहे. हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर हृतिकने आता नकारात्मक भूमिका साकारायची नसल्याचे सांगितले आहे.