बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन त्याच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. हृतिक रोशन अनेकदा त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवरून त्याच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी त्याच्या चाहत्यांशी शेअर करतो.
दरम्यान, हृतिक रोशनचा असा एक फोटो समोर आला आहे, जो पाहून सगळेच आश्चर्यचकित होत आहेत.
हृतिक रोशनचा 'विक्रम वेधा' मधील एक फोटो व्हायरल होत आहे. पण त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीला पाहून चाहत्यांना सुशांतची आठवण येऊ लागली.
या स्टंटमॅनचा चेहरा बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतशी मिळताजुळता आहे.
हृतिक रोशन स्टंटमॅन मन्सूर अली खानसोबत दिसत आहे. मन्सूर अली खान आणि हृतिक रोशनचा हा फोटो 'विक्रम वेधा' चित्रपटाच्या सेटवरील आहे.
हा फोटो पाहिल्यानंतर सुशांत सिंग राजपूतच्या चाहत्यांना धक्काच बसला.
मन्सूर अली खानच्या या पोस्टवर कमेंट करत नेटकरी तो 'सुशांत सिंग राजपूत' सारखाच दिसतो असं म्हणत आहेत.
स्टंटमॅन मन्सूर अली खानचा फोटो पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.