ऋतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद नुकतेच मुंबईतील नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटन समारंभात सहभागी झाले होते.
दोघांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सबा आझाद एका गेस्टसोबत फोटो क्लीक करताना दिसत आहे.
फॅशन डिझायनर अमित अग्रवालने इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. यात पहिल्या फोटोत सबा आझाद अमितसोबत फोटोसाठी पोज देताना दिसते.
अमित अग्रवालसोबत फोटो काढत असताना मागे ऋतिक रोशन कोणाशी तरी बोलताना दिसतोय. यात त्याच्या हातात सबाचे हिल्स आहेत.
एका युजरने म्हटलं की, ऋतिकने किती सहज हिल्स हातात घेतले आहेत. तर दुसऱ्याने याला म्हणतात दिवाना असं म्हटलंय.