मधल्या काही वर्षांमध्ये हनी सिंग इंडस्ट्रीमधून पूर्णपणे गायब झाला होता. अनेकांना त्याच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं आणि आता सर्वांनाच त्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
पण आता हनी सिंगने चाहत्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने मानसिक आजार आणि वेदनादायी संघर्षावर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हनी सिंग त्याच्या करीयरविषयी बोलताना म्हणाला कि, “जेव्हा मी आजारी पडलो त्यावेळी आयुष्यात बरंच काही चालू होतं.''
याच काळात मात्र हनी सिंग विचित्र आजाराशी लढत होता. या काळात त्याला बायपोलर डिसऑर्डर या आजाराची लक्षणे दिसत होती.
याविषयी बोलताना तो म्हणाला कि, ''रॉ स्टार’च्या सेटवर जेव्हा मी बायपोलर डिसऑर्डर आणि सायकॉटिक लक्षणांशी लढत होतो आणि मला हे माहीतही नव्हतं.''
'' पण मला लक्षात आलं होतं की माझ्या मेंदूमध्ये काहीतरी होतंय, काहीतरी समस्या आहे. मला हे ठीक करावं लागेल.''
हनी सिंग पुढे म्हणाला, “माझ्या कुटुंबियांनी मला खूप समजवायचा प्रयत्न केला होता. मात्र मी त्यांना सांगितलं की मला काहीच करायचं नाही मला फक्त यातून बाहेर पडायचंय, ठीक व्हायचंय.''
याविषयी बोलताना तो पुढे म्हणाला, ''या सगळ्यातून बाहेर पडायला मला जवळपास 5 वर्ष लागली. मी ठीक झालो. त्यानंतर मला म्यूझिकवर काम करायचं होतं.''
पण पुन्हा इंडस्ट्रीत परल्यावर हनी सिंगला संघर्ष करावा लागला. याविषयी बोलताना तो म्हणाला, ''मी कमबॅक करत असताना बरंच अपयश आलं. माझं वजन वाढलं होतं. लोकांनी माझा लूक नाकारला होता. गाणी हिट होत होती पण लोक मला स्वीकारायला तयार नव्हते.”