NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / हेमा मालिनीनं लग्नाच्या 43 व्या वाढदिवशी शेअर केली रोमँटिक पोस्ट; सेलिब्रेशनचे खास फोटो आले समोर

हेमा मालिनीनं लग्नाच्या 43 व्या वाढदिवशी शेअर केली रोमँटिक पोस्ट; सेलिब्रेशनचे खास फोटो आले समोर

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची चिरतरुण जोडी अजूनही चाहत्यांच्या आवडीची आहे. आजचा दिवस दोघांसाठी खूपच खास आहे. 43 वर्षांपूर्वी या दिवशी दोघांनीही जगाची पर्वा न करता एकमेकांचा हात धरून लग्नाची गाठ बांधली होती. आज दोघे लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहेत.

19

बॉलीवूडमध्ये अशी अनेक जोडपी आहेत, ज्यांच्या लव्हस्टोरीची खूपच चर्चा होते. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी हे त्यापैकीच एक आहेत.

29

आजचा दिवस दोघांसाठी खूप खास आहे. 43 वर्षांपूर्वी या दिवशी दोघांनीही जगाची पर्वा न करता एकमेकांचा हात धरून लग्नाची गाठ बांधली होती.

39

आज लग्नाच्या वाढदिवशी हेमा मालिनी यांनी ट्विट करून एक-दोन नव्हे तर तब्बल 10 फोटो शेअर करत धर्मेंद्रना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

49

हेमाने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'आज आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ज्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या त्या सर्व लोकांचे मी आभार मानते.'

59

पुढे पोस्टमध्ये म्हटलंय की, 'आम्ही 43 वर्षे एकत्र एक सुंदर प्रवास केला आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने हा प्रवास असाच सुरू राहील. इतक्या वर्षांचे आमचे काही फोटो. असं म्हणत त्यांनी हे फोटो शेअर केले आहेत.

69

हेमा आणि धर्मेंद्र यांच्या मैत्रीची सुरुवात 'तुम हसीन मैं जवान' चित्रपटाच्या सेटवर झाली आणि त्यानंतर दोघांनी 1980 मध्ये लग्न केले.

79

हेमासोबत धर्मेंद्र यांचे हे दुसरे लग्न आहे. त्यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता हेमा मालिनी यांच्याशी लग्न केलं.

89

हेमासोबत लग्न केल्यानंतर त्यांना दोन मुली झाल्या, ज्यांची नावे ईशा आणि आहाना देओल आहेत. हेमा आणि धर्मेंद्र त्यांच्या दोन्ही मुलींचे लग्न झाले आहे.

99

आजच्या दिवशी हेमा आणि धर्मेंद्रचे चाहते त्यांना शुभेच्छा देत असून त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करत आहेत.

  • FIRST PUBLISHED :