टेलिव्हिजन विश्वातील सर्वात सुंदर ऑनस्क्रिन कपल म्हणजे राणा दा आणि पाठक बाई.
हे ऑनस्क्रिन कपल 2 महिन्यांपूर्वी ऑफस्क्रिन खऱ्या आयुष्यात एकमेकांचे झाले.
अभिनेता हार्दीक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांनी 2 डिसेंबरला लग्नगाठ बांधली.
हार्दीक आणि अक्षया लग्नानंतरचे काही दिवस एकमेकांबरोबर घालवत होते. दोघांनीही कामातून ब्रेक घेतला होता.
दोघांना पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स उत्सुक आहेत.
दरम्यान अभिनेता हार्दीक जोशी अखेर लग्नाच्या 2 महिन्यांनी टेलिव्हिजनवर कमबॅक करतोय.
सोनी मराठीवरील सुंदरी या मालिकेत हार्दीक जोशी दिसणार आहे. मालिकेचा नवा प्रोमो देखील रिलीज झाला आहे.
मालिकेत हार्दीकचा डॅशिंग लुक पाहायला मिळतोय. डोळ्याला गॉगल, सूटाबुटातील जबरदस्त लुक समोर आला आहे.
हार्दीक सुंदर मालिकेत IASअजिंक्यची भूमिका साकारणार आहे.
सुंदरीच्या ट्रेनिंगसाठी IAS अंजिक्यची मालिकेत एंट्री होणार आहे.