बॉलिवूडचा 'शेरशाह' सिद्धार्थ मल्होत्रा आज आपला 38 वा वाढदिवस साजरा करत आहे.
त्याने 2012 साली करण जोहरच्या 'स्टुडेंट ऑफ द इयर' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.
त्याआधी सिद्धार्थने 'माय नेम इज खान चित्रपटात सह दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.
सध्या कियारा सोबत लग्नाच्या चर्चांमुळे तो चर्चेत आहे. या दोघांनी 'शेरशाह' चित्रपटात एकत्र काम केलं होतं.
आता येत्या 06 फेब्रुवारी ला दोघेही लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चा आहेत.
पण कियारा आधी सिद्धार्थच्या बॉलिवूडच्या काही टॉप अभिनेत्रींनसोबत अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.
यामध्ये पाहिलं नाव आहे तर आलिया भट्ट. या दोघांनी कधीच रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब केलं नसलं तरी दोघांना अनेक वेळा एकत्र पाहिलं गेलं. महेश भट्ट मुळे दोघांचं ब्रेकअप झालं असं बोललं जातं.
यानंतर सिद्धार्थचं नाव आजकाल चर्चेत असणारं नाव जॅकलिन फर्नांडिस सोबत जोडलं गेलं आहे. या दोघांनी 'ए जेंटलमन' मध्ये एकत्र काम केलं होतं. तेव्हाच त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.
यासोबत सिद्धार्थचं नाव तारा सुतारीया या अभिनेत्री सोबत देखील जोडलं गेलं. 'मरजावा' चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं होतं.