NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / HBD Rinku : सैराटची आर्ची अशी पोहोचली बॉलिवूडमध्ये; मेकओव्हर फोटो पाहून तुम्हीही व्हाल चकित

HBD Rinku : सैराटची आर्ची अशी पोहोचली बॉलिवूडमध्ये; मेकओव्हर फोटो पाहून तुम्हीही व्हाल चकित

सैराटची आर्ची आता 20 वर्षांची झाली आहे. 3 जूनच्या तिच्या वाढदिवसानिमित्त पाहा अभिनेत्री रिंकू राजगुरुचा अभिनय प्रवास.

111

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) ही आता हिंदी चित्रपटसृष्टीतही नशीब आजमावत आहे. सैराटनंतर रिंकूला तुफान प्रसिद्धी मिळाली होती. पण आता रिंकूमध्ये फार मोठा बदल झाला असून ती अतिशय ग्लॅमरस झाली आहे.

211

रिंकू आता तिचा 20 वा वाढदिवस साजरा करत आहे. अगदी कमी वयातच रिंकूने मोठं यश संपादन केलं आहे.

311

यासोबतच रिंकूने तिच्या लुकवरही मोठ काम केलं आहे. पूर्वीपेक्षा तिच्यात अनेक बदल झाले आहेत तसेच ती स्वतःला अधिकाधिक फिट करण्याचा प्रयत्न करत आहे.

411

रिंकूने सैराट नंतर 'कागर', 'मेकअप' या चित्रपटांत काम केलं मात्र ते बॉक्सऑफिसवर फार यशस्वी होताना दिसले नाहीत.

511

त्यानंतर रिंकूने तिचे गुरू नागराज मंजूळे यांचाच 'झुंड' (Zhund) हा बॉलिवूड चित्रपट साईन केला मात्र अद्याप तो प्रदर्शित झाला नाही. त्यात ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणार आहे.

611

मागील वर्षी ती 'हंड्रेड' (Hundred) या वेबमालिकेत दिसली होती. त्यात तिने लारा दत्ता सोबत काम केलं होतं. यातील तिच्या कामाचं कौतुकही झालं होतं.

711

रिंकू झुंड चित्रपटातूनच ब़ॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. मात्र तो चित्रपट प्रदर्शित न झाल्याने तिने वेबसीरिजमधूनच पदार्पण केलं आहे.

811

याशिवाय रिंकू 'आठवा रंग प्रेमाचा' या मराठी चित्रपटातही झळकणार आहे.

911

रिंकू काही जाहिरातींमध्यही झळकली आहे.

1011

रिंकूचा नवा मेकओव्हर लुक तिच्या चाहत्यांना चांगलाच पसंत पडत आहे. सोशल मीडियावर तिचे नवनवीन लुक शेअर करत असते.

1111

रिंकूच्या वाढदिवसानिमित्त तिला शुभेच्छा

  • FIRST PUBLISHED :