NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / HBD Prarthana Behere: प्रार्थना बेहेरेनं गाठली वयाची चाळीशी; आई कधी होणार विचारल्यावर म्हणते...

HBD Prarthana Behere: प्रार्थना बेहेरेनं गाठली वयाची चाळीशी; आई कधी होणार विचारल्यावर म्हणते...

प्रार्थना बेहरे ही मराठी विश्वातील सुंदर, गोड आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मराठी चित्रपट आणि मालिकांमुळे प्रार्थना बेहरे ही नावारुपाला आली. पवित्र रिश्ता या गाजलेल्या मालिकेतून अभिनयविश्वात पदार्पण केलेल्या प्रार्थनाने आज चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज ही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी प्रार्थना आपला 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील एक रंजक किस्सा...

110

प्रार्थना बेहरे ही मराठी विश्वातील सुंदर, गोड आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मराठी चित्रपट आणि मालिकांमुळे प्रार्थना बेहरे ही नावारुपाला आली.

210

सध्या ती माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहा हे पात्र साकारत आहे. प्रार्थनाच्या लग्नाला बराच काळ उलटला आहे.

310

प्रार्थनाने 2017 साली अभिषेक जावकरसोबत लग्नगाठ बांधली.

410

अनेक जण प्रार्थनाला तू आई कधी होणार असा प्रश्न विचारत असतात. तिने एका मुलाखतीत यावर स्पष्ट शब्दात उत्तर दिले होते.

510

प्रार्थना बेहरे बस बाई बस या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी कार्यक्रमातील महिला वर्गाने तिला 'तू मालिकेत एका मुलीच्या आईचे पात्र साकारत आहे, तर मग खऱ्या आयुष्यात आई कधी होणार आहेस?' असा प्रश्न तिला विचारला.

610

त्यावर तिने थोडं रागात सुबोध भावेकडे पाहिलं आणि त्यावर तिने चिडक्या स्वरात उत्तर दिले.

710

ती म्हणाली, 'तुम्ही सर्व चांगलेच प्रश्न विचारताय ना? मग चांगलाच प्रश्न विचारा ना? असे प्रार्थना त्यांना म्हणाली. त्यावर महिला वर्गाने हे चांगलं आहे, असे म्हटले.'

810

त्यापुढे ती म्हणाली, माझ्या सासूबाईही हा शो बघत आहेत. पण मी काही वाईट काम करते का? पण मग हे सर्व झाल्यावर मला काम करता येणार नाही. नको ना… हा विषय नको.'

910

ती पुढे म्हणाली होती कि, 'मला खूप बाळं आहेत. आमच्या पाच पाळीव श्वान आहेत, १२ घोडे आहेत आणि मासे आहेत, दोन उंदीर आहेत, अशी खूप मुलं आहेत. त्याबरोबर मायरा माझी मुलगीच आहे.' असे तिने या प्रश्नाला टोलवाटोलवी करत उत्तर दिले.

1010

दरम्यान आज वाढदिवसानिमित्त प्रार्थनावर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

  • FIRST PUBLISHED :