अभिनेत्री जान्हवी कपूरने 2018 साली 'धडक' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जान्हवी कपूर आज तिचा 26 वा वाढदिवस साजरा करत आहे.
बॉलिवूडची सुपरस्टार श्रीदेवीची लेक असून तिने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. यामुळेच अल्पावधीतच जान्हवी बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत सामील झाली आहे.
वृत्तांवर विश्वास ठेवला तर जान्हवी प्रत्येक चित्रपटासाठी ५ कोटी रुपये घेते.
एका रिपोर्टनुसार, तिला तिच्या पहिल्याच 'धडक' चित्रपटासाठी तब्बल 45 लाख रुपये मिळाले होते.
याशिवाय ती एंडोर्समेंट आणि मॉडेलिंगमधूनही भरपूर कमाई करते.
2022 मधील एका मीडिया रिपोर्टनुसार, जान्हवी 58 कोटींची मालकीण आहे.
तसेच जान्हवीचं जुहूमध्ये आलिशान घर आहे. या घराची किंमत जवळपास 38 कोटी आहे. जान्हवीकडे आलिशान गाड्या देखील आहेत.
जान्हवीनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. गुंजन सक्सेना, घोस्ट स्टोरीज, मिली, रूही यांसारख्या चित्रपटांमध्ये जान्हवीनं काम केलं आहे. जान्हवीचा दोस्ताना-2, तख्त हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.