दिया मिर्झा सध्या पती वैभव रेखीसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. दियाचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी अभिनेत्रीने साहिल संघासोबत लग्नगाठ बांधली होती.
साहिल आणि दियाची प्रेमकहाणीही खूप रंजक आहे. लग्नाआधी दोघेही एकमेकांना बराच काळ डेट करत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही 2009 मध्ये भेटले होते.
असे म्हटले जाते की, दिया एका चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकण्यासाठी गेली होती जिथे दोघे पहिल्यांदा भेटले होते. यानंतर हळुहळू दोघांची चर्चा वाढत गेली आणि प्रकरण प्रेमापर्यंत पोहोचले. जवळपास पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर साहिलने एक दिवस दियाला प्रपोज केले.
अभिनेत्रीने लगेचच त्याचा प्रस्ताव स्वीकारला आणि 2014 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण काही वर्षांनी दोघांमध्ये दुरावा येऊ लागला. लग्नाच्या पाच वर्षांनंतर दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
तब्बल 11 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 2019 मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर दोन वर्षांतच दिया मिर्झाने गेल्या वर्षी 2021 साली 15 फेब्रुवारीला तिचा प्रियकर वैभव रेखी पुन्हा लग्न केले.
दियाच्या दुसऱ्या लग्नाच्या बातमीने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का मिळाला होता. वैभव रेखी हा मुंबईचा बिझनेसमन आहे.
अनेक रिपोर्ट्सनुसार, दिया आणि वैभवची पहिली भेट 2020 मध्ये झाली होती. लॉकडाऊनची वेळ आली होती. दोघांनी लॉकडाऊनचा वेळ एकत्र घालवला. दोघेही जवळपास एक वर्ष एकमेकांना डेट करत होते आणि त्यांनी आपले नाते अत्यंत गुप्त ठेवले होते.
जवळजवळ 1 वर्ष एकमेकांसोबत वेळ घालवल्यानंतर आणि एकमेकांना समजून घेतल्यानंतर, दिया आणि वैभव यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि 15 फेब्रुवारी 2021 रोजी लग्न केले. आता त्यांना एक गोंडस मूल देखील आहे.