NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Happy Birthday Arya: गायिका ते अभिनेत्री; असा होता आर्या आंबेकरचा सुरेल प्रवास

Happy Birthday Arya: गायिका ते अभिनेत्री; असा होता आर्या आंबेकरचा सुरेल प्रवास

वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षापासून आर्या गिरवत आहे सुरांचे धडे. 16 जूनला 27 व्या वर्षात पदार्पण करणारी आर्या कशी झाली लोकप्रिय गायिका पाहा .

110

मराठी कलाविश्वातील गोड गळ्याची गायिका तसेच अभिनेत्री म्हणून आर्या आंबेकरची (Aarya Ambekar) आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षी आर्याने गायला सुरुवात केली होती. पाहा आर्या कशी झाली लोकप्रिय गायिका.

210

आर्याचा जन्म 16 जून 1994 ला नागपूरमध्ये झाला होता.

310

आर्याचे वडिल समीर आंबेकर हे डॉक्टर असून आई श्रुती आंबेकर या देखील गायिका आहेत. याशिवाय आर्याची आजी देखील गायिकाच होत्या. त्यामुळे आर्याला घरातूनच सुरांचं बाळकडू मिळालं होतं.

410

आर्या केवळ 2 ते 3 वर्षांची असतानाच तिच्यातील सूर तिच्या कुटुंबियांनी ओळखले होते. आणि तेव्हापासूनच ती सुरांचे धडे गिरवत आहे.

510

आर्याची आई हीच तिची पहिली गुरू होती. आर्याने आपल्या आईकडूनच पहिले सुरांचे धडे घेतले होते.

610

2008 साली तिने 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' या रियॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. ज्यात तिची निवड झाली आणि ती अगदी शेवटच्या राउंडपर्यतही पोहोचली होती. तिने शो जिंकला नसला तरीही अनेक श्रोत्यांची मन तिने जिंकली होती. त्यानंतर आर्याला खरी ओळख मिळाली.

710

आर्याने यानंतर अनेक चित्रपटांसाठी गायण केलं. तसेच अनेक मालिकांचे शिर्षकगीते तिने गायली आहेत. तर ती सुपरहीटही ठरली आहेत. याशिवाय तिच्या सौंदर्याचीही तितकीच प्रशंसा केली जाते. 'यंग प्रिटी गर्ल' अशी तिची ओळख लहाणपणीच बनली होती.

810

2017 साली आर्याने 'ती सध्या काय करते' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यातीलही तिचं काम हे उल्लेखणाय ठरलं. याशिवाय चित्रपटातील गाणीही तिने गायली होती. अभिनेता अभिनय बेर्डे, अंकुश चौधरी, तेजश्री प्रधान यांच्यासोबत तिने काम केलं होतं.

910

लवकरच आर्या 'रंगीला रे ' या चित्रपटाही दिसणार असते. आर्याचा मोठा चाहतावर्ग असून सोशल मीडियावरही तिची मोठी फॅनफॉलोइंग आहे.

1010

'कितीदा नव्याने', 'टिपूर चांदणे', 'गर्जती सह्याद्रीचे कडे' अशी अनेक सुपरहीट गाणी आर्याने गायली आहेत.

  • FIRST PUBLISHED :