मागील वर्षी अथांग ही मराठी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
तेजस्विनी पंडितची निर्मिती असलेल्या या दर्जेदार वेब सीरिजला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
या सीरिजमध्ये रुक्कमीणी हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीनं सर्वांचं लक्ष वेधलं.
एका सीनमध्ये ती स्व: संरक्षणासाठी स्वत:च्या हातानं वस्तरा घेऊन आपले काळे भोर लांब सडक केस कापते.
सीरिजमधील हा भाग अंगावर रोमांच आणणारा होता. ही अभिनेत्री सध्या प्रसिद्ध मराठी मालिकेत काम करतेय.
ही अभिनेत्री ज्या मालिकेत काम करतेय त्या मालिकेत सध्या तिच्या लग्नाचा ट्रॅक सुरू आहे.
स्व: संरक्षणासाठी हाती वस्तरा घेऊन केस कापणारी ही अभिनेत्री म्हणजेच रसिका वखारकर.
कलर्स मराठीवरील पिरतीचा वणवा उरी पेटला या मालिकेत ती काम करत असून सावी हे पात्र ती साकारत आहे.