सिनेसृष्टी आणि क्रिकेटविश्व यांचं फार पूर्वीपासून घट्ट नातं आहे. अनेक क्रिकेटर्सची नावं आजवर अनेक अभिनेत्रींशी जोडली गेली होती. अनेकांची लग्न झाली पण काहीचं नात हे अफेअर पूर्तचं मर्यादीत होतं. पाहा कोण होत्या या अभिनेत्री.
अभिनेत्री किम शर्मा आणि क्रिकेटर युवराज सिंग यांच्या नात्याची फार चर्चा होती. मात्र नंतर ते वेगळे झाले. युवराजने हेजल किचसोबत लग्न केलं.
अभिनेत्री नीना गुप्ता आणि वेस्ट इंडीज क्रिकेटर विवियन रिचर्ड यांचं नात सध्या फार चर्चेत आहे. या गोष्टीला काही दशकं उलटली असली तरीही नीना यांच्या पुस्तकामुळे हे नव्याने ऐकायला मिळत आहे. त्यांना मसाबा गुप्ता ही मुलगी देखील आहे. पण त्यांनी कधीच लग्न केलं नव्हतं. कमी काळातच ते वेगळे झाले.
हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री इशा गुप्ता यांच्या अफेयरची फार चर्चा होती. मात्र नंतर हार्दिकने रशियन मॉडेल नताशा सोबत विवाह केला. त्यांना क मुलगा ही आहे.
झहीर खानचं अभिनेत्री इशा शर्वानीसोबत अफेअर होतं. अनेक वर्षे ते एकत्र होते मात्र नंतर ते वेगळे झाले. झहीरने अभिनेत्री सागरिका घाटगेशी विवाह केला.
८०च्या दशकातील प्रसिद्ध क्रिकेटर रवी शास्त्री आणि अभिनेत्री अमृता सिंग याचं नात काही वर्षे होतं. मात्र ते वेगळे झाले.
अभिनेत्री राय लक्ष्मी आणि महेंद्रसिंग धोनी यांच नातही फार चर्चेत राहीलं होतं मात्र काही काळातच तेही तुटलं.
अभिनेत्री सोफिया हयातने सांगितलं होतं की तिने रोहीत शर्माला डेट केलं आहे. पण काही काळातच ते वेगळे झाले. रोहीतने आता रितिका सजदेहशी विवाह केला आहे.