NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / लग्नानंतर दोनच महिन्यात अभिनेत्रीने दिली Good News; एव्हलिन शर्मा होणार आई

लग्नानंतर दोनच महिन्यात अभिनेत्रीने दिली Good News; एव्हलिन शर्मा होणार आई

अभिनेत्री एव्हलिन शर्मा लवकरच आई होणार आहे. चाहत्यांसोबत तिने गोड बातमी शेअर केली आहे.

17

बॉलिवूड अभिनेत्री एव्हलिन शर्मा लवकरच आई होणार आहे. नुकतीच तिने ही बातमी शेअर केली आहे. एव्हलिन नुकतीच विवाहबद्ध देखील झाली होती.

27

एव्हलिनने डॉक्टर तुषान भिंडी यांच्यसोबत मे महिन्यात लग्नगाठ बांधली होती. दोघांनीही अगदी वैयक्तिकरित्या विवाह केला होता.

37

विवाहाच्या दोनच महिन्यानंतर एव्हलिनने तिच्या चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. तिने एक फोटो शेअर करत लिहिलं की, 'तुला माझ्या बाहूत घेण्यासाठी वाट पाहू शकत नाही.' यानंतर अनेक सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

47

जर्मन आणि भारतीय वंशाची असलेली एव्हलिन बॉलिवूडमध्ये सक्रिय होती. याशिवाय ती एक प्रसिद्ध मॉडेलही आहे.

57

तुषान आणि एव्हलिन यांनी ऑस्ट्रेलियात लग्नगाठ बांधली होती. तुषान हा भारतीय वंशाचा असून तो ऑस्ट्रेलियात स्थाईक आहे. तो एक नामवंत सर्जन आहे.

67

‘नौटंकी साला’, ‘ये जवानी है दिवानी’, ‘यारियां’, ‘मैं तेरा हीरो’, ‘जैक एंड जिल’ आणि ‘साहो’ या चित्रपटांत एव्हलिन दिसली होती.

77

एव्हलिन आणि तुषान यांनी लग्न झाल्यानंतर १ महिन्याने लग्नाची बातमी दिली होती. जून महिन्यात त्यांनी विवाहबद्ध झाल्याचं जाहीर केलं होतं.

  • FIRST PUBLISHED :