सध्या सगळेच दिवाळी साजरी करत आहेत. काही दिवसांपासून बॉलिवूड सेलिब्रेटींच्या दिवाळी पार्टीचे फोटो पाहात आहोत. पण आपल्या मराठमोळ्या कलाकारांनाही दिवाळीची जंगी पार्टी केली आहे.
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या घरी मराठी सेलेब्सची दिवाळी पार्टी रंगली होती.
सिद्धार्थ आणि मिताली यांनी काही दिवसांआधीच मुंबईत नवं घर खरेदी केलं. याच घरी दोघांनी सिनेसृष्टीतील त्यांच्या जवळच्या मित्र मैत्रिणींना दिवाळी सेलिब्रेशनसाठी आमंत्रित केलं होतं.
शुटींगमधून वेळ काढून कलाकारांनी सेलिब्रेशनचा मनसोक्त आनंद घेतला.
अभिनेत्री इशा केसकर, क्षिती जोग, हेमंत ढोमे, लोकेश गुप्ते, गायत्री दातार हे कलाकार सिद्धार्थच्या घरी पार्टीसाठी आले होते.
त्याचप्रमाणे अभिनेत्री गौरी नलावडे, पूजा सावंत, रोहित राऊत, जुईली जोगळेकर यांनीही हजेरी लावली होती.
गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांच्याबरोबर मिताली आणि सिद्धार्थ यांची खास मैत्री आहे.
अभिनेत्री गौरी नलावडेनं देखील सिद्धार्थ मितालीबरोबर त्यांच्या नव्या घरी फोटो क्लिक केलेत.
सिद्धार्थ मितालीच्या घरच्या दिवाळी पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.