दिशा पटानी 13 जून रोजी तिचा 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. दिशाने लखनऊच्या एमिटी युनिव्हर्सिटीमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. तिने 2013 मध्ये सौंदर्य स्पर्धा जिंकली होती. 'लोफर' या तेलुगु चित्रपटातून तिने अभिनयाच्या जगात पाऊल ठेवले आणि आज बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
दिशाच्या वाढदिवसानिमित्त तिचा एक्स बॉयफ्रेंड टायगर श्रॉफने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एवढंच नाही तर टायगरच्या आईने देखील तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार दिशा पटनी आणि टायगर श्रॉफ यांची पहिली भेट बेफिक्रा या म्युझिक व्हिडिओच्या शूटिंगदरम्यान झाली होती. यानंतर 2018 मध्ये दोघांनी 'बागी 2' मध्येही काम केले.
दिशाने 'बागी 3'च्या स्पेशल गाण्यासाठीही शूटिंग केले. या सगळ्या दरम्यान दिशा आणि टायगर एकमेकांजवळ आले. डिनर डेटपासून ते काही खास प्रसंगी दोघे नेहमीच एकत्र दिसायचे.
दिशा टायगरच्या कुटुंबातही मिसळली होती. कोरोना महामारीच्या काळातही दिशा टायगरच्या घरी होती. दोघेही तब्बल 6 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.
दिशाला टायगरसोबत लग्न करायचं होतं, त्यासाठी तिने तसं वचन मागितलं होतं. पण टायगरला मात्र करिअरवर लक्ष केंद्रित करायचं होतं. हे त्यांच्या ब्रेकअपच कारण बनलं असं म्हटलं जातं.
दुसरीकडे, काही रिपोर्ट्सनुसार टायगरने आकांक्षा शर्माला डेट करायला सुरुवात केली होती. दोघे कॅसानोव्हामध्ये एकत्र होते. टायगर आणि दिशाचे नाते तुटण्यामागे आकांक्षा कारणीभूत असल्याचेही म्हटले जाते.
टायगर आणि दिशाच्या ब्रेकअपची बातमी ऐकून चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता.