NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Esha Deol: लेकीच्या 'त्या' बिकिनी सीनवर हेमा मालिनी यांनी अशी दिली होती प्रतिक्रिया; ईशा देओलनं केला खुलासा

Esha Deol: लेकीच्या 'त्या' बिकिनी सीनवर हेमा मालिनी यांनी अशी दिली होती प्रतिक्रिया; ईशा देओलनं केला खुलासा

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल बॉलिवूडमध्ये फारशी चमकदार कामगिरी करू शकली नसली तरी तिने साकारलेल्या काही भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहेत. असाच एक चित्रपट म्हणजे 'धूम'. या सिनेमात तिने बिकिनी घालून चांगलीच खळबळ उडवून दिली होती. पण तो सिन पाहून तिची आई म्हणजेच अभिनेत्री हेमा मालिनीची काय प्रतिक्रिया होती याचा खुलासा आता ईशाने केला आहे.

18

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल बॉलिवूडमध्ये फारशी चमकदार कामगिरी करू शकली नसली तरी तिने साकारलेल्या काही भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहेत. असाच एक चित्रपट म्हणजे 'धूम'.

28

2004 मध्ये यशराज फिल्म्सच्या धूममध्ये ईशा देओलने बिकिनी सीन केला होता. आता अभिनेत्रीने या बोल्ड सीनबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

38

ईशा देओलने 'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, 'बिकिनी सीन शूट करण्यापूर्वी मी खूप घाबरले होते.'

48

हा बिकिनी सिन शूट करणे तिच्यासाठी सोपे नव्हते. याविषयी बोलताना ईशा म्हणाली कि, 'माझ्या आईने मला सांगितले की तू हे खूप काळजीपूर्वक कर आणि अचूक पद्धतीने शूट कर. आदित्य चोप्रानेही मला या सीनसाठी ६ महिन्यांचा वेळ दिला होता.'

58

ईशा म्हणाली, 'आदित्यने मला सांगितले की आपण एक चित्रपट करणार आहोत. तुझा एक वेगळा अवतारही दाखवला जाणार आहे. या चित्रपटात तुला बिकिनी घालावी लागेल. म्हणून आतापासूनच तयारी कर' तेव्हा मी त्याला सांगितलं की मला यासाठी माझ्या आईची परवानगी घ्यावी लागेल.

68

ईशा पुढे म्हणाली, 'मी पुन्हा घरी आले आणि आईला याबाबत विचारले. त्यावेळी मी खूप घाबरले होते.'

78

ईशा देओलने हेमा मालिनी यांना बिकिनी घालण्याबाबत विचारले असता, त्या म्हणाल्या, यात विचारण्यासारखे काय आहे. होय, नक्कीच तू बिकिनी घालून सीन शूट करू शकतेस.' एवढंच नाही तर हेमा मालिनी यांनी लेकीला 'खूप चांगले शूट कर, काळजीपूर्वक तो सीन दे.' असा सल्ला देखील दिला होता.

88

'धूम' 2004 साली रिलीज झाला होता, ज्यामध्ये अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम ते उदय चोप्रा आणि ईशा देओल दिसले होते. या चित्रपटात ईशाने शीनाची भूमिका साकारली होती.

  • FIRST PUBLISHED :