मालेगाव पासून सुमारे 18 किमी अंतरावर 5 हजार लोकसंख्या असलेले टोकडे गाव असून या गावात असलेल्या एका विद्यालयाला धर्मेंद्र याची आई सत्यवती कौर यांचं नाव देण्यात आलेलं आहे.
या छोट्याशा गावातील शाळेला धर्मेंद्रच्या आईचं नाव कसं देण्यात आलं त्यामागे एक कहाणी आहे.
त्यामुळे जाट समाजात टोकडे गावाचे वेगळे आणि महत्वाचे स्थान असल्याने धर्मेंद्र यांनी येथील विद्यालयाला आईचे नाव देऊन आर्थिक मदत केली. एवढंच नाही तर 1984 साली टोकडे गावाला भेट देखील दिली होती.
त्यावेळी त्यांची बैलगाडीतुन मिरवणूक काढण्यात आल्याची माहिती जाट समाजाचे नेते विठोबा दयानंद यांनी दिली आहे. पण आता या शाळेची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
काही दिवसा पूर्वी आलेल्या वादळात विद्यालयाच्या काही खोल्यांचे पत्रे उडून गेले तर भिंती देखील पडल्या आहे. सध्या या विद्यालयाची दयनीय अवस्था झाली असून ज्या वर्गात विद्यार्थी बसतात त्यांची वाईट अवस्था झाली आहे.
धर्मेंद्र यांनी एकदा भेट दिली होती त्यानंतर मात्र ते कधीही आले नाही, मदत केली नाही जर त्यांनी मदत केली असती तर शाळा सुंदर झाली असती असे विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील फरस यांनी सांगितले.
शाळेची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून धर्मेंद्र यांनी मदत करावी अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
विद्यालय एकच कुटुंब चालवते तर इतर समाज बांधव मॅनेजमेन्ट कमिटीवर नसल्यामुळे धर्मेंद्र नाराज आहे, त्यामुळे ते लक्ष देत नसल्याचे विठोबा दयानंद यांचे म्हणणे आहे तर आम्हांला कोणाच्या मदतीची गरज नसल्याचे मुख्याध्यापक सुनील फरस सांगतात. समाजातील दोन गटात असलेल्या मतभेदाचा फटका विद्यालयाला बसत असल्याचे दिसून येत आहे.