साऊथ कलाकार हे त्यांच्या भूमिकांसाठी काहीही करण्यास तयार असतात. त्यांच्या भूमिकेत ते इतके रमतात की त्याच्यासाठी काहीही करण्यासाठी ते एका पायावर तयार होतात. टक्कल करणं तर त्यांच्यासाठी कोणतीच मोठी गोष्ट नाहीये.
थलायवी रजनीकांत यांनी अनेक सिनेमांसाठी आपले केसांचं बलिदान दिलंय. शिवाजी सिनेमात रजनीकांत टकले दाखवण्यात आलेत. त्यांचा हा लुक चांगलाच फेमस देखील झाला होता.
आपल्या भूमिकेवर वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या लिस्टमधील दुसरं नाव आहे अभिनेते कमल हसन. अलावंधन सिनेमात कमल हासन यांनी डबल रोल केला होता. एका पार्टमध्ये त्यांचं टक्कल होतं.
कैथी आणि पोन्नियन सेलवन सिनेमाचा हिरो अभिनेता कार्थीनं त्याच्या लुकनं त्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. काशमोरा सिनेमात त्याला ओळखणं देखील कठीण होतं. या सिनेमावेळी निर्मात्यांनी त्याला विग घालण्यास सांगितलं होतं पण त्यानं कार्थी सिनेमासाठी हेड शेव केली आणि तो त्याचा समोर आलेला क्लासिक लुक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.
अभिनेता धनुषनं केलेलं केसांचं टक्कल हे त्याच्या आगामी डी50 सिनेमासाठी आहे. याआधी त्यानं कॅप्टन मिलर सिनेमासाठी दाढी आणि केस वाढवले होते.
आई या सिनेमासाठी अभिनेता चियान विक्रमने देखील केसांचं टक्कल केलं होतं. पण बाला सिनेमातील चियान ओळखूच येत नाहीत. दोन्ही सिनेमांसाठी त्यानं केसांचं टक्कल केलं.
अभिनेता सूर्याने गजनी सिनेमासाठी केसाचं टक्कल केलंहोतं. प्रेक्षकांनी त्याच्या भूमिकेला पसंती दिली होती.