NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / लग्नाआधीच प्रेग्नंट होती अभिनेत्री; एकाच व्यक्तीसोबत केलं दोनदा लग्न; दुसऱ्या लग्नात तर लेकानेही केलं फुल्ल एन्जॉय

लग्नाआधीच प्रेग्नंट होती अभिनेत्री; एकाच व्यक्तीसोबत केलं दोनदा लग्न; दुसऱ्या लग्नात तर लेकानेही केलं फुल्ल एन्जॉय

छोट्या पडद्यावरची 'पार्वती' अशी ओळख असणारी अभिनेत्री म्हणजेच पूजा बॅनर्जी. तिचं आयुष्य कायमचं चर्चेत राहिलं. पूजा लग्नाआधीच प्रेग्नंट झाली होती. तर अभिनेत्रीने एकदा नाही तर दोनदा लग्न केलं. इतकंच नाही तर पूजाच्या दुसऱ्या लग्नात त्यांचा मुलगाही सहभागी झाला होता.

19

देवो के देव महादेवमध्ये पार्वतीची भूमिका साकारून पूजा बॅनर्जी घराघरात प्रसिद्ध झाली आहे. आज ती खूप प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचं आयुष्य कायमचं चर्चेत राहिलं.

29

अभिनेत्रीने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, ती वयाच्या 15 व्या वर्षी कोणाच्यातरी प्रेमात पडली होती आणि प्रेमासाठी घरातून पळून गेली होती. जरी तिला लवकरच तिची चूक समजली.

39

पूजाने दोनदा लग्न केले आहे. पण तिने एकाच व्यक्तीसोबत दोनदा लग्नगाठ बांधली.

49

खरं तर, पूजा अभिनेता कुणाल वर्मासोबत रिलेशनशिप मध्ये होती. त्यानंतर ती लग्नाआधीच प्रेग्नंट झाली होती आणि घाईघाईत तिने 2020 मध्ये कुणाल वर्मासोबत रजिस्टर्ड मॅरेज केलं होतं.

59

कुणालसोबत लग्न झाल्यानंतर 6 महिन्यांनीच पूजाने एका गोंडस मुलाला जन्म दिला.

69

त्यानंतर या अभिनेत्रीने 2021 मध्ये कुणालसोबत गोव्यात पूर्ण विधींनुसार लग्न केलं. गोव्यात पूजा आणि कुणालच्या लग्नाला त्यांच्या मुलानेही हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांचा मुलगा एका वर्षाचा होता.

79

पूजाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्री सध्या पडद्यापासून दूर असली तरी तिने टीव्हीसह बंगाली आणि साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे.

89

पूजाने 2011 मध्‍ये तेलगू चित्रपट 'वीडू थेडा'मधून करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात ती निखिल सिद्धार्थसोबत दिसली होती.यानंतर पूजाने बंगाली इंडस्ट्रीत काम केले आणि खूप नाव आणि प्रसिद्धी मिळवली.

99

छोट्या पडद्यावर पार्वतीची भूमिका साकारल्यानंतर पूजा घराघरात प्रसिद्ध झाली. अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे आणि तिचे फोटो आणि तिच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक अपडेट चाहत्यांसाठी शेअर करत असते.

  • FIRST PUBLISHED :