इंडस्ट्रीतील बहुतेक अभिनेत्रींचे सलमानसोबत काम करण्याचे स्वप्न असते. तर अनेकींना खुद्द सलमाननेच चित्रपटसृष्टीत येण्याची संधी दिली. काही अभिनेत्री अशाही आहेत ज्यांना सलमानसोबत स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळाली पण त्यांनी चित्रपटात काम करण्यास नकार दिला.
सलमान खानसोबत चित्रपटाची ऑफर नाकारणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत पहिले नाव दीपिका पदुकोणचे आहे. दीपिका पदुकोणने सलमान खानसोबत एक-दोन नव्हे तर सहा चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या होत्या हे कदाचित फार कमी जणांना माहीत असेल. रिपोर्ट्सनुसार, दीपिका पदुकोणला सलमानसोबत 'जय हो', 'बजरंगी भाईजान', 'सुलतान', 'किक', 'प्रेम रतन धन पायो' आणि 'शुद्धी' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करण्याची ऑफर आली होती.
बॉलीवूडची क्वीन कंगना राणौत तिच्या चित्रपटांची निवड अतिशय काळजीपूर्वक करते. कंगना आणि सलमानही एका चित्रपटात एकत्र काम करणार होते. कंगना राणौतला सलमान खानच्या 'सुलतान' चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाली.
कंगना रणौतने सलमान खानच्या या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. यानंतरही सलमान खान आणि कंगना रणौत कोणत्याही चित्रपटात एकत्र दिसले नाहीत.
अमृता रावने देखील सलमान खान सोबत काम करण्यास नकार दिला आहे. अमृता रावला सलमान खानच्या 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटात स्वरा भास्करची भूमिका ऑफर करण्यात आली होती. या चित्रपटात अमृताला सलमान खानची ऑन-स्क्रीन बहिण बनण्याची संधी मिळाली. अमृता रावला सोनम कपूरची भूमिका करायची होती. म्हणून तिने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला.
सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांनी संजय लीला भन्साळी यांच्या हम दिल दे चुके सनम या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री खूप आवडली होती.
या चित्रपटातून दोघांमधील जवळीक वाढली. त्यांच्या अफेअर आणि ब्रेकअपच्या बातम्याही चर्चेत होत्या. यानंतर सलमान खान आणि ऐश्वर्या राय कधीही एकत्र पडद्यावर दिसले नाहीत.
सकीना या व्यक्तिरेखेने बॉलिवूडमध्ये इतिहास रचणारी अभिनेत्री अमिषा पटेल सलमान खानसोबत 'ये है जलवा' या चित्रपटात दिसली. सलमान खानचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप फ्लॉप ठरला. या चित्रपटानंतर पुन्हा एकदा अमिषा पटेलला सलमान खानसोबत काम करण्याची ऑफर आली. 'ये है जलवा'चा प्रतिसाद पाहून अमिषा पटेलनेही सलमान खानसोबत काम करण्यास नकार दिला.