लोकप्रियतेच्या बाबतीत ही अभिनेत्री एखाद्या अभिनेत्यापेक्षा कमी नाही आणि तिने आलिया भट्टच्या खूप आधी हॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
ही अभिनेत्री म्हणजे दीपिका पदुकोण. तुम्हाला माहित आहे का की आज बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक असलेल्या दीपिका पदुकोणकडे एकेकाळी 10 हजारही नव्हते. ती बॉलिवूडमध्ये येण्याचे स्वप्न पाहत होती, म्हणून तिने कर्ज घेऊन आपला पोर्टफोलिओ बनवला होता.
आज दीपिका पदुकोण ही इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या 16 वर्षांच्या करिअरमध्ये दीपिकाने अनेक हिट सिनेमे दिले.
दीपिका पदुकोणने शाहरुख खान स्टारर 'ओम शांती ओम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली होती. पण हिरोईन बनणे तिच्यासाठी इतके सोपे नव्हते.
खरंतर दीपिकाला तिचं बॅडमिंटन करिअर सोडून बॉलिवूड अभिनेत्री व्हायचं होतं. ज्यासाठी तिला खडतर प्रवास करावा लागला. तेव्हा ना दीपिकाकडे इतका पैसा होता ना तिला इंडस्ट्रीत कोणी गॉडफादर होता.
तिला पोर्टफोलिओ बनवण्यासाठी पैशांची नितांत गरज होती, पण तेव्हा तिच्या खिशात 10 हजारही नव्हते.
दीपिका तिच्या मुलाखतीत म्हणाली होती, 'मी पोर्टफोलिओसाठी आईकडून 10 हजार रुपये उधार घेतले होते. तिला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं होतं. तिने आईला एक दिवस ते पैसे परत करीन असं वचन दिलं.
यानंतर, तिने पहिल्या चित्रपटानंतर खरचंच आईला उधार घेतलेले पैसे परत दिले.