अभिनेत्री दीपिका पदुकोण ही भारतीय प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री आहे.
तिने आपल्या निखळ सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने भारतीय चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. भारताप्रमाणेच देशाबाहेरसुद्धा तिची लोकप्रियता अधिक आहे.
आता दीपिकाच्या कारकिर्दीत अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
नुकतीच जगातील सर्वात सुंदर दहा महिलांची नावे जाहीर करण्यात आली असून, यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणनेही आपले स्थान निर्माण केले आहे.
जगातील 10 सुंदर महिलांमध्ये दीपिका पदुकोणचा समावेश झाला आहे. दहाव्या क्रमांकावर निवडलेली दीपिका ही भारतातून निवड झालेली एकमेव महिला आहे.
जगातील सर्वात सुंदर महिलांची यादी प्राचीन ग्रीक गणिती पद्धती नुसार काढली जाते. ज्याचे नाव आहे 'गोल्डन रेशो ऑफ ब्युटी' असे आहे.
या पद्धतीने सौंदर्याचे गुणोत्तर काढले जाते. या पद्धतीत डोळे, नाक, ओठ, हनुवटी, जबडा आणि चेहऱ्याच्या आकाराचे गुणोत्तर काढून सौंदर्य मोजले जाते. यानंतर शरीरानुसार गणना केली जाते. त्यानंतर फी बाहेर येते. ज्याच्या आधारे सौंदर्य ठरवले जाते.
यावेळी लंडनस्थित गणितज्ञ 'डॉ डी सिल्वा' यांनी ही यादी तयार केली आहे. यंदाच्या यादीनुसार हॉलिवूड अभिनेत्री जोडी कोमरने या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. कोमरच्या चेहऱ्याचे प्रमाण 94.52% वर आले आहे. दुसरीकडे, दीपिका पदुकोणने पद्धतीनुसार 91.22% गुण मिळवले आणि ती 10 व्या स्थानावर आहे.
आता ही बातमी ऐकून दीपिकाचे चाहते सध्या खूपच आनंदी झाले आहेत. दीपिकाच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं तर ती यापूर्वी 'गेहराईयां' या चित्रपटातून दिसली होती. तसेच मध्यंतरी '८३' या चित्रपटात देखील झळकली होती.
हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार चांगली कमाई करू शकले नव्हते. येणाऱ्या काळात ती ‘मेगा ब्लॉकबस्टर’ या चित्रपटात झळकणार असून अजून काही प्रोजेक्ट्स मार्गावर आहेत.