सध्या राज्यात संचारबंदी आहे. कामाशिवाय बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांश लोक घरीच वेळ घालवत आहेत. यात सेलिब्रिटींचाही समावेश आहे. बॉलिवूड अभिनेत्री या कालावधीत घरी राहून नेमकं काय करत असतील असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना.
मलाइका अरोरा - अभिनेत्री मलाइका अरोरा ही रोजच तिच्या फिटनेस सेंटरजवळ दिसायची. मात्र लॉकडाऊनमुळे तीदेखील घरूनच काम करत आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने वर्क फ्रॉम होम असं कॅप्शन लिहित फोटो पोस्ट केला होता.
सारा अली खान - सारादेखील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर घरीच वेळ घालवताना दिसली. नुकताच तिने तिच्या घराचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा लॉकडाऊनचा वेळ तिने या कामासाठी खर्च केला.
कतरिना कैफ - अभिनेत्री कतरिना कैफ काहीच दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर तिने काही स्वत:ला होम क्वारंटाइन करत काही दिवस उपचार घेतले. आठवडाभरानंतर ती कोरोनामुक्त झाली आहे. संपूर्ण वेळ ती घरातच असल्याने सोशल मीडियावर ती अॅक्टिव्ह असायची.
करीना कपूर खान - अभिनेत्री करीना कपूर नुकतीच दुसऱ्यांदा आई झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये ती कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसत आहे. नुकताच तिने मुलांसोबत सैफचा एक फोटो पोस्ट केला होता. ज्यात तिने आपल्या बाळाचा चेहरा मात्र दाखवला नाही.