कॉमेडीयन कपिल शर्माची भलीमोठी फॅन फॉलोइंग आहे. २००७ साली त्याने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. तर आता तो एक लोकप्रिय कॉमेडियन बनला आहे. 'किस किस को प्यार करूं' आणि 'फिरंगी' या चित्रपटांतही त्याने काम केलं आहे. पण काही मोठे चित्रपटही त्याने नाकारले होते.
बँक चोर
2017 मध्ये आलेला चित्रपट बँक चोर मध्ये रितेश देशमुख आणि विवेक ओबरॉय मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट कपिललाही ऑफर झाला होता. पण त्याने काम करण्यास नकार दिला होता.
मुबारकां
2017 मध्ये आलेला मल्टीस्टारर रोमँटिक कॉमेडी चित्रपट मुबारकां मध्ये अर्जुन कपूर आणि अनिल कपूर मुख्य भूमिका साकारल्या होत्या कपिललाही हा चित्रपट ऑफर झाला होता मात्र त्याने नकार दिला.
तेज
2012 मध्ये आलेला थ्रिलर चित्रपट तेज मध्ये अजय देवगन होता हा चित्रपटही कपिलला ऑफर करण्यात आला होता पण त्याने तो नाकारला होता.
वो सात दिन रीमेक
1983 मध्ये आलेला अनिल कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरे स्टारर चित्रपट वो सात दिनचा रिमेक बनणार होता. कपिलला चित्रपटासाठी विचारण्यात आलं होतं. मात्र त्याने हाही चित्रपट नाकारलं होतं.
24
2013 मध्ये आलेला २४ चित्रपटालाही कपिलने नकार दिला होता.
इंडिया पूछेगा सबसे शाना कौन
या रिअॅलिटी शोसाठी कपिल शर्माला स्पेशल गेस्ट म्हणून बोलवलं होतं मात्र त्याने नकार दिला होता.