अभिनेत्री प्रिया बापट लवकरच तिची सुपरहिट सीरिज 'सीटी ऑफ ड्रिम्स'च्या दुसऱ्या सीझनला घेऊन येत आहे. पहिल्या पर्वाच्या यशानंतर आता प्रेक्षकही आतुरतेने वाट पाहत आहेत.
येत्या ३० जुलैला दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर ही सीरिज पाहता येणा आहे.
एक गृहीनी ते राजकारणी असा प्रवास दुसऱ्या पर्वात पाहायला मिळत आहे. पण पहिल्यापेक्षा यात प्रिया पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.
पहिल्या पर्वातील लेस्बियन किस हा सीन विशेष ठरला होता.
तर या पर्वात प्रियाचा मर्डर होणार असं एकंदरीत ट्रेलर वरून दिसत आहे.
त्यामुळे नव्या सिझनविषयी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, अतुल कुलकर्णी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
आता पहिल्या पर्वाच्या तुलनेत हा सीझन किती हिट ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.