सीआयडी हा लोकप्रिय शो आहे ज्याने टीव्ही जगतात 20 वर्षे राज्य केले आहे. आजही हा शो हेडलाइन्स बनवण्यात मागे हटत नाही. दया, अभिजीत आणि एसीपीसह अभिनेत्यांची खरी नावे काय आहेत आणि ते आजकाल कुठे आहेत हे जाणून घेऊया.
सीआयडीच्या दया ते एपीसी प्रद्युम्न आणि अभिजीतपर्यंत प्रत्येकजण प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहेत.
'सीआयडी'चा पहिला एपिसोड 21 जानेवारी 1998 रोजी रिलीज झाला आणि त्याने 20 वर्षे टीव्हीवर राज्य केले. ज्याचे दिग्दर्शन बीपी सिंग यांनी केले होते.
CID मधील सगळ्यात गाजलेली एपीसी प्रद्युम्न ही भूमिका मराठी आणि हिंदीतील प्रसिद्ध शिवाजी साटम यांनी साकारली होती. ते 2021 मध्ये आलेल्या तापसी पन्नूच्या हसीन दिलरुबामध्ये दिसले होते, तर नुकताच तो बांबू या मराठी चित्रपटातही त्यांनी महत्वाची भूमिका साकारली होती.
CID मधील दया ही भूमिका अभिनेता दयानंद शेट्टी यांनी साकारली होती. विकी कौशलच्या गोविंदामध्ये दयानंद शेट्टी इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसला होता. याशिवाय तो अनेक वेळा 'सावधान इंडिया'चे सूत्रसंचालन करताना दिसतो.
CID मधील अभिजित म्हणजेच अभिनेता आदित्य श्रीवास्तव सध्या बी सिनेमात बॅक टू बॅक मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसत आहे. तो नुकताच राजकुमार रावच्या भीड या चित्रपटात दिसला होता.
डॉ.साळुंखे यांची भूमिका नरेंद्र गुप्ता यांनी साकारली होती. तो शेवटचा 2022 मध्ये फॉरेन्सिक या चित्रपटात दिसला होता.
फेड्रिक ही भूमिका दिनेश फडणवीस यांनी साकारली होती. 2014 मध्ये, तारक मेहता के उल्टा चष्मा आणि त्यानंतर 2021 मध्ये CIF मध्ये दिनेश फडणवीस पाहुणे कलाकार म्हणून दिसला होता. तेव्हापासून ते कुठेही दिसले नाहीत.
इन्स्पेक्टर सचिन म्हणजेच हृषीकेश पांडे अजय देवगणच्या रनवे 34 मध्ये दिसला होता. याशिवाय तो सध्या एकता कपूरच्या बेकाबू या मालिकेत दिसत आहे.
पंकज उर्फ अजय नागरथने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तो सीआयडीमध्ये इन्स्पेक्टर पंकजच्या भूमिकेत दिसला. सध्या तो बडे अच्छे लगते हैं 2 मध्ये दिसत आहे.
डॉ. तारिका म्हणजेच श्रद्धा मुसळेने 2012 मध्ये लग्नगाठ बांधली. तिने आजपर्यंत पोरस आणि खिडकी या सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.