प्रत्येक मुलीला साडी नेसायला हे आवडतचं. तुम्हाला पण जर साडी नेसायला आवडतं असेल आणि बॉलिवूड अभिनेत्रीसारखं सुंदर दिसायचं असेल तर अशा प्रकारची रफल साडी एकदा नक्की ट्राय करा. दीपिका पादुकोण ते आलिया भट्ट, शिल्पा शेट्टी या सर्वांना सध्या रफेल साडीचं वेड लागलं आहे.
नुकतचं परिणीती चोप्राचा साखरपुडा पार पडला. या सोहळ्या बहीण प्रियांका चोप्रानं पिवळ्या रंगाची रफल साडी नेसली होती. या साडीवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या, शिवाय प्रियांका देखील या साडीत खूपच सुंदर दिसत होती.
दीपिका पादुकोण हिनं देखील पिवळ्या रंगाच्या रफल साडीत फोटोशुट केलं होतं.
आलिया भट्टला देखील मोरपंखी रफल साडी खूपच सुंदर दिसत आहे.
शिल्पा शेट्टी नेहमी वेगवेदळे कपडे ट्राय करताना दिसते. ती या रफल साडीत नेहमीसारखीच सुंदर दिसत आहे.
रवीन टंटन देखील लाल रंगाची रफल साडी नेसली आहे. पार्टीसाठी ही साडी उत्तम पर्याय आहे.
भूमी पेडणेकर देखील लाल रंगाच्या या रफल साडीत सुंदर पोझ देताना दिसत आहे.
सोनाक्षी सिन्हाच्या लुकमध्ये रफल साडी आधिक भर टाकत आहे.