NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'या' 6 अभिनेत्रींने सनी देओलसोबत काम करायला दिला नकार, चौघींनी तर 'गदर' सिनेमाची नाकरली होती ऑफर

'या' 6 अभिनेत्रींने सनी देओलसोबत काम करायला दिला नकार, चौघींनी तर 'गदर' सिनेमाची नाकरली होती ऑफर

22 वर्षांपूर्वी जेव्हा 'गदर 2' चा 'गदर' हा प्रीक्वल प्रदर्शित झाला तेव्हा हा चित्रपट भारतीय प्रेक्षकांच्या मनात घर करेल असे कोणालाच वाटले नव्हते. तारा सिंह आणि सकिना यांच्या भूमिकेतील सनी देओल आणि अमिषा पटेल ही हिट जोडी 'गदर 2'मधून पुनरागमन करत आहे, पण अमिषा पटेलच्या आधी सकीनाची भूमिका काही प्रसिद्ध अभिनेत्रींना ऑफर करण्यात आली होती, मात्र सनी देओलसोबत काम न करण्याच्या आग्रहामुळे या अभिनेत्रींच्या हातून मोठी संधी निसटली. आज या अभिनेत्रींना त्यांच्या निर्णयाचा पश्चाताप होत आहे.

17

22 वर्षांपूर्वी जेव्हा 'गदर 2' चा 'गदर' हा प्रीक्वल प्रदर्शित झाला तेव्हा हा चित्रपट भारतीय प्रेक्षकांच्या मनात घर करेल असे कोणालाच वाटले नव्हते. तारा सिंह आणि सकिना यांच्या भूमिकेतील सनी देओल आणि अमिषा पटेल ही हिट जोडी 'गदर 2'मधून पुनरागमन करत आहे, पण अमिषा पटेलच्या आधी सकीनाची भूमिका काही प्रसिद्ध अभिनेत्रींना ऑफर करण्यात आली होती, मात्र सनी देओलसोबत काम न करण्याच्या आग्रहामुळे या अभिनेत्रींच्या हातून मोठी संधी निसटली. आज या अभिनेत्रींना त्यांच्या निर्णयाचा पश्चाताप होत आहे. (फोटो क्रेडिट्स: Instagram @iamsunnydeol)

27

सनी देओलने खुलासा केला होता की, त्यावेळी काही अभिनेत्रींनी त्याच्याऐवजी शाहरुख, सलमान आणि हृतिक रोशनसारख्या सुपरस्टारसोबतच्या चित्रपटात काम करण्यास प्राधान्य दिले. या अभिनेत्रींनी त्यावेळी सनी देओलसोबत काम करण्यास नकार दिला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'गदर'च्या निर्मात्यांनी सकीनाच्या भूमिकेसाठी काजोलशी संपर्क साधला, पण तिला सनी देओलसोबत काम करण्यात रस नव्हता. (फोटो क्रेडिट्स: Instagram @kajol)

37

सनी देओलने एकदा ऐश्वर्या रायला एका चित्रपटात काम करण्याची संधी दिली होती, ज्यासाठी ती तयार नव्हती. ऐश्वर्या रायलाही 'गदर' ऑफर करण्यात आल्याची चर्चा होती, ज्यासाठी अभिनेत्री तयार नव्हती. (फोटो क्रेडिट्स: Instagram @aishwaryaraibachchan_arb)

47

माधुरी दीक्षितने सनी देओलसोबत 'त्रिदेव' चित्रपट केला होता, मात्र जेव्हा तिला 'गदर'ची ऑफर आली तेव्हा तिने हा चित्रपट करण्यास नकार दिला. (फोटो क्रेडिट्स: Instagram @madhuridixitnene)

57

आलिया भट्टची आई सोनी राजदान यांनी 'गदर'मध्ये एक रोल ऑफर करण्यात आला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीला डेटची समस्या होती, त्यामुळे त्यांनी काम करण्यास नकार दिला. (फोटो क्रेडिट्स: Instagram @sonirazdan)

67

सनी देओलने एकदा श्रीदेवी यांना देखील 'घायल' चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली होती. तेव्हा अभिनेत्री त्याच्यासोबत काम करण्यास तयार नव्हती.

77

पंजाबी अभिनेत्री निम्रत खैराला 'गदर 2' मध्ये रोल ऑफर करण्यात आला होता. शेतकरी आंदोलनामुळे तिनं ही ऑफर नाकारल्याचे बोलले जात आहे. 65 वर्षीय सनी देओल सध्या त्याची कोस्टार अमिषा पटेलसोबत 'गदर 2'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे, जो 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

  • FIRST PUBLISHED :