बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली बॉलिवूड अभिनेत्री ठरली आहे.
श्रद्धा कपूर सोशल मीडियावर चांगलीच अँक्टिव्ह असते. अनेक स्टायलिश फोटोशूट आणि व्हिडीओ ती शेअर करत असते.
श्रद्धानं इन्स्टाग्रामवर 75 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे. आनंद साजरा करत श्रद्धानं खास पोस्ट शेअर केली आहे.
'75 मिलियन्सचं सेलिब्रेशन चहाबरोबर. मोठी मोठी इन्स्टा फॅमिली, छोटा छोटा आनंद', असं म्हणत श्रद्धानं फोटो शेअर केला आहे.
83.3 मिलियन फॉलोअर्स असलेल्या देसी गर्ल प्रियांका चोप्रानंतर सध्याच्या घडीला श्रद्धा दुसरी सर्वाधिक फॉलोअर्स असलेली बॉलिवूड अभिनेत्री ठरली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफला ही श्रद्धानं तगडी फाइट दिली आहे. कतरिनाचे इन्स्टाग्रामवर 68.4 मिलियन फॉलोअर्स आहेत.
तर नुकतीच आई झालेली अभिनेत्री आलिया भट्टचे 72.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. आलिया सध्याची ट्रेडिंग अभिनेत्री आहे.
तर अभिनेत्री दीपिका पादुकोणला श्रद्धानं टक्कर दिली आहे. दीपिकाला इन्स्टाग्रामवर 69.9 मिलियन फॉलोअर्स आहेत.