Fashion faceoff सिनेसृष्टीसाठी नवं प्रकरण नाही. अनेकदा अभिनेत्री सारखेच कपडे परिधान करतात, आणि मग कोणावर हा ड्रेस जास्त खूलून दिसतो यावर चर्चा सुरू होते. बऱ्याचदा सारखेच डिझायनर असल्याकारणाने किंवा योगायोगाने. आता बॉलिवूडची अभिनेत्री सारा अलि खान आणि टेलिव्हिजन ची फॅशनिस्ट निया शर्मा या दोघींनीही सारखेच कपडे परिधान केले आहेत. इतकच काय तर रंग ही सारखाच.
सारा अलि खान - सारा ने हा निळ्या रंगाचा गाऊण परिधान केला होता. आणि त्यामध्ये ती अतिशय ग्लॅमरस दिसत होती.
सारा ने डिझायनर आणि ब्रॅण्ड असलेल्या AADNEVIK चा हा गाऊण परिधान केला होता.
नुकताच पार पडलेला फिल्मफेअर सोहळ्यासाठी सारा ने गेट अप केला होता.
तब्बल पाच लाखांपेक्षा अधिक या ड्रेसची किंमत आहे.
तिच्या चाहत्यांना हा लूक आवडला असून तिच्यावर कमेंट्स चा वर्षावही झाला आहे.
अभिनेत्री निया शर्मा हिंदी टेलिव्हिजन चा एक लोकप्रिय चेहरा आहे. ती देखील कपड्यांच्या बाबतीत नेहमीच नवनवीन प्रयोग करत असते.
यावेळी निया ने अगदी हुबेबूब सारा अलि खान सारखाच गाउण परिधान केला होता.
निया ने सुमनफॅशन या डिझायनर चा गाउण परिधान केला होता.
त्यामुळे आता निया ने साराला कॉपी केल्याचं म्हटलं जात आहे.
नियाच्या चाहत्यांनाही तिचा हा लूक आवडला असून तिच्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.