NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'मी पुन्हा येते आहे...' रिया चक्रवर्ती गॅंग लीडर बनून करतेय कमबॅक

'मी पुन्हा येते आहे...' रिया चक्रवर्ती गॅंग लीडर बनून करतेय कमबॅक

एमटीव्ही रोडीजच्या आगामी सीजनची सगळीकडं जोरदार चर्चा रंगलेली आहे. विशेष म्हणजे या सीजनमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती दिसणार आहे.

111

एमटीव्ही रोडीजच्या आगामी सीजनची सगळीकडं जोरदार चर्चा रंगलेली आहे. विशेष म्हणजे या सीजनमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती दिसणार आहे.

211

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर रिया चक्रवर्ती चांगलीच चर्चेत आली होती. आता या सगळ्यानंतर एमटीव्ही रोडीजच्या या सीजनच्या माध्यमातून रीया पून्हा कमबॅक करणार आहे.

311

एमटीव्हीच्या या सीजनची थीम ‘कर्म या कांड’ अशी असणार आहे. अभिनेता सोनू सूद हा शो होस्ट करताना दिसणार आहे. तर तीन गॅंग लीडर असणार आहेत. यामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती, प्रिंस नरुका, गौतम गुलाटी यांचा समावेश असणार आहे.

411

रिया चक्रवतीचं रोडीजसोबत खास कनेक्शन आहे. रियानं तिच्या करिअरची सुरूवात एमटीव्ही रोडीज आणि टीव्हीएस स्कूटी शोच्या माध्यमातून केली होती

511

तिनं आजपर्यंत अनेक शो होस्ट केले आहेत. तिच्या कमबॅकबद्दल बोलताना रिया म्हणाली की, मला एमटीव्ही रोडीजच्या कर्म या कांड या सीजनमध्ये सहभागी होण्याची संधी मिळतेय, यासाठी मी खूप उत्सुक आहे. एमटीव्हीसोबत काम करणं माझ्यासाठी माझ्या घरात काम कऱण्यासारखं आहे. एका नात्यानं माझी घर वापसी झाल्याचं तिनं म्हटलं.

611

सोनू सूद आणि गॅंग ली़डर्ससोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे. कारण या शोच्या निमित्ताने मला माझं धाडस दाखवता येईल. माझं कमबॅकचं चाहते नक्कीच कौतुक करतील आणि मला प्रोत्साहन देतील अशी अशा रियानं यावेळी व्यक्त केला आहे.

711

रिया चक्रवर्ती गॅंग लीडर बनून करतेय कमबॅक

811

रियानं यानिमित्त एक पोस्ट केली आहे. तिनं म्हटलं आहे की,अजूनही माझा द्वेष, तिरस्कार करणाऱ्यांना मला सांगायचे आहे की, मी पुन्हा येते आहे.

911

तुम्हाला काय वाटले मी पुन्हा येणार नाही का, पण तसे होणार नाही. मी कुणालाही घाबरत नाही. मला कुणाला घाबरावे असे वाटत नाही. अशा शब्दांत रियानं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या तिच्या या पोस्टची चांगलीच चर्चा रंगलेली आहे.

1011

सुशांत सिंह राजपूत आत्महत्.या प्रकरणात रियाचं नाव चांगलेच चर्चेत आलं होत. या प्रकरणानंतर तिचं करिअर संपल्यात जमा झाल्याची चर्चा रंगली होती.

1111

तिचं घरातून बाहेर पडणं देखील मुश्कील झालं होत. आता या सगळ्या घडामोडींनंतर ती कमबॅक करत आहेत. तिच्या या कमबॅकला चाहते कसा प्रतिसाद देणार याबद्दल सर्वांना उत्सुकता लागली आहे.

  • FIRST PUBLISHED :