आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा आणि बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिचा आज, 13 मे रोजी थाटात साखरपुडा पार पडला आहे.
या दोघांच्या साखरपुड्याचे फोटो परिणीतीने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
परिणीतीने राघव चढ्ढा यांच्यासोबत रोमॅंटिक फोटो शेअर केले आहे. दोघांची जोडी खूपच सुंदर दिसत आहे.
चाहत्यांसह सेलेब्सकडून परिणीती चोप्रा व राघव चढ्ढा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
परिणीती चोप्रा सध्या फारशी चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी तिने अनेक हिट सिनेमे दिले आहेत. बॉलिवूडमधील आघाडीच्या नायिकांमध्ये तिचं नाव घेतलं जातं. चित्रपट फ्लॉप झाले तरी तिचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे.
राघव चड्ढा हा सर्वात कमी वयाचे राज्यसभा सदस्य आहेत. राघव चड्ढा आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. (फोटो साभार- प्रणिती चोप्रा इन्स्टाग्राम)